Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएम फंडासह मुंबई-ठाणे मनपाची चौकशी करा

उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

मुंबई/प्रतिनिधी ः आम्ही कोणत्याही चौकशीला भीक घालत नाही. अशा कितीही चौकश करा, आम्ही घाबरणार नाही, मात्र चौकशी करायचीच असेल तर, पीएम केअर फंडासह म

राज्यातील जनतेला फसवण्याचा धंदा उद्धव ठाकरेंनी सुरू केला आहे काय…? (Video)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला दुष्काळग्रस्तांशी संवाद
तर, देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः आम्ही कोणत्याही चौकशीला भीक घालत नाही. अशा कितीही चौकश करा, आम्ही घाबरणार नाही, मात्र चौकशी करायचीच असेल तर, पीएम केअर फंडासह मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेची देखील करा, असे प्रतिआव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. ज्या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून ते काय चौकशी करणार, असा तिखट सवाल देखील त्यांनी यावेळी केला. मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायची तर ठाणे मनपाची चौकशी करा. भाजपचे आमदार शरद केळकर यांनीच ही मागणी केली आहे. पण या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच काही किंमत नाही, तर केळकरांची काय असणार, असा खोचक टोलाही ठाकरेंनी यावेळी सत्ताधार्‍यांना लगावला आहे. पीएम केअर फंडची चौकशी करायला हवी.जशी आमची चौकशी करता आहात तशी तुमची चौकशी करायला हवी. मिळेल तिथे खा अशी आमची परंपरा नाही, आम्ही चौकशीला घाबरत नाही. पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर मनपाची चौकशी करायला हवी. कोरोना काळात राज्याने 15 दिवसांमध्ये रुग्णालये चालू केली, तर केंद्र सरकारने नुसत्या थाळ्या आणि टाळ्या वाजवायला लावले. कोरोना काळात एकाही मृतदेहाची आम्ही विटबंना होऊ दिली नाही. आम्ही कुणाच्या परिवारावर बोलत नाही, फडणवीसांनी आमच्या परिवारावर बोलू नये. हो तुम्ही म्हणताय ना की कुटुंबाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी म्हणतो हो सुरू आहे, ही शिवसेना माझे कुटुंब आहे. आणि वारस्याच्या टीकेवर बोलताना माझ्या वडीलांचे अजोबा देखील प्लेगच्या साथीच्या वेळेस काम करत होते. मी नायक आहे की खलनायक आहे हे जनता ठरवेल, असा इशारा देखील ठाकरे यांनी यावेळी दिला.  मेहबुबा मुफ्ती माझ्या बाजूला बसल्या असे तुम्ही म्हणता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तुमच्या बाजूला बसले आहेत. मोठी लोक ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण जायला हवे म्हणून आम्ही गेलो. मी चुकीचा असेल तर भाजपचे नेते चुकले हे सर्वांनी मान्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

…तर, विखेंवर छापे टाका – भाजपकडून सध्या विरोधकांच्या चौकश्या सुरु आहेत. मात्र भाजपची हिंमत असेल तर त्यांनी भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी झाकीर नाईक याच्याकडून साडेचार कोटी रूपये घेतले, हिंमत असेल तर विखे यांच्या घरी धाड टाका, असे प्रतिआव्हान त्यांनी भाजपला दिले.

परिवारावर येवू नका, अन्यथा शवासन करावे लागेल – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीकाफडवणीस यांनी केली होती. त्याला शनिवारी ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिले. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS