Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन दिवसात दाखला देण्याचा पाटण तहसिलदारांचा अभिनव उपक्रम

पाटण / प्रतिनिधी : सामान्य नागरिकांच्या तक्रारी व दाखले अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्य सरकारकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या का

एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले
उच्च शिक्षणासाठी शिवराज विश्‍वनाथ डांगे इंग्लंडला रवाना

पाटण / प्रतिनिधी : सामान्य नागरिकांच्या तक्रारी व दाखले अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्य सरकारकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला. त्यानुसार सर्वाधिक प्रमाणात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत दिले जाणारे ऑनलाईन दाखले व सेवा दोन दिवसात देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दोन दिवसात सर्व शासकीय दाखले देण्यास सुरुवात केली आहे. यापुढे ही सेवा अशीच चालू ठेवण्याचा निर्धार व ग्वाही पाटण तालुक्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.
पाटणचे प्रातांधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पाटील यांनी हा अभिनव उपक्रम राबवला. हा उपक्रम सुरू केल्यापासून तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही सर्व प्रकारचे शासकीय दाखले जास्तीत जास्त दोन दिवसात देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याने पाटण तालुक्यातील डोंगर दर्‍यातून व पठारावरून येणारे नागरिकांकडून तहसीलदारांचे आभार मानले.

COMMENTS