Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासाच्या बाबतीत दक्षिण भागावर कायमच अन्याय – अ‍ॅड.प्रताप ढाकणे

जिल्ह्याला मिळणार्‍या निधीत सर्वाधिक निधी उत्तरेकडे जात असल्याची खंत

पाथर्डी/प्रतिनिधी ः 1985 सालापासून नगर जिल्ह्याचे विभाजन करावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर

संगणक शिक्षण ही काळाची गरज ः संजय जोशी
लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण
Dakhal : पंतप्रधान मोदी आणि अमित शहाने देशाचे वाटोळे केले LokNews24

पाथर्डी/प्रतिनिधी ः 1985 सालापासून नगर जिल्ह्याचे विभाजन करावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद केला जातो.आजही जिल्ह्याला मिळणार्‍या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी हा उत्तरेक नेला जातो.मात्र ज्या ज्या वेळी अशी मागणी पुढे येते उत्तरेतील नेते मंडळी मुख्यालय श्रीरामपूरला असावे की संगमनेरला यावरून वाघाचा बनाव निर्माण करून मुख्य मागणीवरून लक्ष विचलित करतात. संवाद यात्रेनिमित्त आयोजित मिरी येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते. यावेळी शिवशंकर राजळे, भगवानराव दराडे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, अमोल वाघ, राजेंद्र म्हस्के, रफिक शेख, प्रकाश शेलार, अभिजीत ससाने, राहुल गवळी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ढाकणे यांनी म्हटले की, जिल्ह्याच्या तुलनेत नगरच्या दक्षिण भागावर कायमच अन्याय होत आलेला आहे राजकीय सोयीसाठी म्हणून या भागाकडे उत्तरेतील नेत्यांनी पहिली सत्ता मिळवली आणि या दुष्काळी भागावर समस्या सोडवण्याची वेळ येते तेव्हा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळणार्‍या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी उत्तरेत पळवला जातो.राजकारणाच्या स्वार्थासाठी या भागाचा वापर काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक केला जातो.आजची परिस्थिती वेगळी नाही 1985 ला दक्षिण जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी एकत्रित रित्या एक पत्र देऊन जिल्हा विभाजनाची मागणी केली तेव्हापासून आजपर्यंत ही मागणी प्रलंबित आहे.नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी चे नाव देण्या देण्यास काय हरकत आहे मात्र त्यालाही सत्तेतील पुढारी विरोध करतात हे आपले दुर्दैव आहे संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न जाणून घेत आहोत प्राजक्ता तनपुरेंनी राहुरी मतदारसंघातील पाथर्डीतील 39 गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढला दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि आज या भागातील विकासासाठी निधी मिळवायला तनपुरे यांना संघर्ष करावा लागतो. आमदार तनपुरे म्हणाले राज्य सरकार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या मानसिक देत नाही सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांना पराभवाची भीती सतावते आहे त्यामुळेच ढाकणे यांनी काढलेली संवाद यात्रा लोकांना धीर देणारी ठरत आहे अशा यात्रेच्या माध्यमातून नेते व जनता यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होते.आजचे भाजप सरकार शेतकर्‍यांची वीज तोडत आहेत अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव आहे मिरी भागातील शेतकर्‍यांच्या विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण शिराळ येथे उपकेंद्राची मंजुरी घेतली.त्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल.  आम्ही पण जनतेतून निवडून आलेला आमदार आहोत लोकांचे प्रश्‍न सोडवायचे नसतील मग आमचे आमदार काय मिरवायला झालो आहोत का. महाविकास आघाडीच्या कामांना आजचे राज्य सरकार केवळ स्थगिती देण्यात प्रत्येक दिवस वाया घालवत आहे हे योग्य नाही आपण हे सर्व ओळखून यापुढे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक करून आभार उद्धव दुसरं यांनी मानले.

COMMENTS