नेकनूर प्रतिनिधी - बालाघाट अनेक संतांची पवित्र भूमी आहे या भूमीत स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत तरुणांनी उभारलेला उद्योग नक्कीच प्रे
नेकनूर प्रतिनिधी – बालाघाट अनेक संतांची पवित्र भूमी आहे या भूमीत स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत तरुणांनी उभारलेला उद्योग नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी नांदूरफाटा (पांढर्याचीवाडी) येथे नानासाहेब काकडे, लक्ष्मण शेळके, राजेंद्र शेळके, अशोक शेळके यांनी नविन सुरु केलेल्या सनराईज पॅकेजड ड्रिंकींग वॉटर या पाणी बॉटल प्लॅन्टचा भव्य शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे, ह.भ.प.ज्ञानोबा माऊली महाराज, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, डॉ.योगेश क्षीरसागर, अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, तानाजी कदम, हर्षद क्षीरसागर, माधवराव मोराळे, बाजीराव बोबडे, विठ्ठल वंजारे, संतोष हंगे, राणा डोईफोडे, सुग्रीव रसाळ, शेख फईम, शालिनीताई कराड, प्रेम कोकाटे, राजाभाऊ शेळके, सखाराम गदळे, अरुण बोंगाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की बालाघाट ही पवित्र भूमी असून या ठिकाणी परमपूज्य बंकट स्वामी मन्मत स्वामी आणि संत ज्ञानेश्वर माऊली सारख्या महान संतांची भूमी आहे त्यामुळे या भूमीतून निर्माण झालेल्या प्रत्येक व्यवसायाला यश प्राप्त होते स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रेरणा अशा उद्योगातून मिळत असते राज्यातून आणि राज्य बाहेरून या भागामध्ये भाविकांची मोठी उपस्थिती असते त्यामुळे या भागात शुद्ध आणि चांगले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सनराइज उद्योग महत्वाचा ठरावा, पाणी म्हटलं की हे एक निसर्गाचे वरदान आहे, जगण्यासाठी ऑक्सिजन पाणी ही दैवी देणगी आहे, पृथ्वीतलावर केवळ तीन टक्के पाणी पिण्यायोग्य असून बाकी 97 टक्के पाण्याचा वापर आजही होत नाही केवळ हे पाणी पृथ्वीतलावर समुद्र आणि नद्या अशी विखुरलेले आहे शुद्ध पाण्याची गरज शरीराला खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग हे भविष्यकाळासाठी महत्त्वाचे ठरणार आहे ग्रामीण भागात स्वतःच्या पायावर उभा राहून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही खूप चांगली गोष्ट असून शेळके बंधूचा हा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने जावा असे ते म्हणाले यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS