झी मराठीवर 'मन उडू उडू झालं' ही मालिका काही महिन्यांपूर्वी भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hrita Durgule) नं दीपूची तर अभिनेता अज
झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hrita Durgule) नं दीपूची तर अभिनेता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) नं इंद्राची भूमिका साकारली होती. आता इंद्रा आणि दीपूची म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे दोघे आता मालिकेत नव्हे तर एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. लवकरच या दोघांचा ‘कन्नी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती समोर येताच या दोघांचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत.

COMMENTS