Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा मास्क सक्तीचे संकेत

नागपुुुरात शासकीय कार्यालयात मास्क सक्ती

मुंबई/नागपूर ः चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेची उडालेली धावपळ या पार्श्‍वभूमीवर भारतात खबरदारीचे उपाय म्हणून ऑक्सिज

लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी
आर्यन खानची आज होणार सुटका
महिला स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा जनजागृती अभियानात सहभाग

मुंबई/नागपूर ः चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेची उडालेली धावपळ या पार्श्‍वभूमीवर भारतात खबरदारीचे उपाय म्हणून ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेटिंलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले असतांना, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्तीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच नागपुरात शासकीय कार्यालयात मास्क सक्ती करण्यात आली असून, तसे आदेशच नागपूर जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत.


नागपुरात देखील प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजनांना सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक केले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी मास्क लावण्याचा सूचना दिल्या आहेत. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. पुढचे काही दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनासाठी अख्खं मंत्रिमंडळ आणि महत्वाचे नेते नागपुरात असल्याने त्यांच्या आरोग्याची जबाबदारी देखील प्रशासनावर आहे. सध्या आंतरराष्ट्रीय विमान तळावर देखील परदेशातून येणार्‍या नागरिकांची थर्मल चाचणी करण्यात येणार आहे. त्यानुसार नागपुरात येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी मास्क लावण्या संदर्भात केलेल्या सुचनांमद्धे शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क लावणे बंधनकारक असेल असे म्हटले आहे. नागरिकांना मास्क लावण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितले आहे. शहरात कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्या. तसेच लसीकरण देखील वाढवण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील काही मंदिरामध्ये मास्कसक्ती –
संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही मास्क सक्ती करण्यात आली नसली तरी, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी आणि कर्मचार्‍यांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. भाविकांनाही मास्क वापरण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिर्डीच्या साई मंदिरात आणि शनिशिंगणापूरच्या मंदिरातही मास्कसक्ती करण्यात आली. भवानी मंदिरातही कर्मचार्‍यांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना अद्याप मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

COMMENTS