नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये केवळ लडाखमध्येच नाही तर आता हिंद महासागरात देखील तणाव वाढणार आहे. लडाखच्या पूर्वेला दोन्ही देशांचे सैनिक आमनेसा
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये केवळ लडाखमध्येच नाही तर आता हिंद महासागरात देखील तणाव वाढणार आहे. लडाखच्या पूर्वेला दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने असतांना चीनने आता आणखी कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. भारत पुढील आठवड्यात ओडीशा येथील अब्दुल कलाम द्वीप समूहावरून आंतरखंडिय क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे. या चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने त्यांची हेरगिरी करणारे जहाज हिंद महासागरात तैनात केले आहे.
भारतीय नौदलाने चीनचे हे हेरगिरी करणारे जहाज ट्रॅक केले आहे. हे जहाज इंडोनेशिया येथील सुंडा स्ट्रेत येथे तैनात केले आहे. हेरगिरी करणारे हे जहाज चीनने या आधी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या हंबनतोटा येथील बंदरावर तैनात केले होते. युआंग वाणग 5 असे या हेरगिरी करणार्या चीनी जहाजाचे नाव आहे. तब्बल 20 हजार टन वजन असणार्या या जहाजावर मोठे एंटीना, अडवांन्स सेन्सर, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावले आहेत. तब्बल 400 हून अधिक क्रू मेंबर या जहाजावर आहेत. हे जहाज उपग्रह ट्रक करू शकते. तसेच त्याच्यावर नजर देखील ठेऊ शकते.
COMMENTS