Homeताज्या बातम्यादेश

भारताची पहिली हायड्रोजन बस होतेय सुरू

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सोमवारपासून सुरू होत आहे. ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारत एक महत्त्वाचं पाऊल टाकत

Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.
या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी
रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सोमवारपासून सुरू होत आहे. ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारत एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहे, कारण सोमवारपासून भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा सरू होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. इंडियन ऑईलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील विशिष्ट मार्गांवर 15 ग्रीन हायड्रोजन बस चालवण्यासाठी चाचणी घेतली. यातील दोन बसचा सेट 25 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीतील इंडिया गेट येथून लाँच करण्यात येईल. यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाखच्या आणि लेहच्या रस्त्यांवरही हायड्रोजन बसची सेवा सुरू होणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा आहे. राज्यातील जास्त उंचीवरील, थंड प्रदेशातील, वाळवंटातील सार्वजनिक रस्त्यांवर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची व्यावसायिक चाचणी घेऊन तिथेही हायड्रोजन फ्युएल सेल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे

इंडियन ऑईलने फरीदाबाद येथील आर अँड डी कॅम्पसमध्ये इंधन भरण्याची सुविधा देखील स्थापित केली आहे, जी सौर पीव्ही पॅनल्स वापरून इलेक्ट्रोलिसिसद्वारे उत्पादित ग्रीन हायड्रोजनचे इंधन भरण्यास सक्षम आहे. लाँच करण्यात येणाऱ्या बस एकत्रितपणे 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापतील. हिरव्या हायड्रोजनद्वारे भारतातील शून्य-उत्सर्जन गतिशीलतेचं भविष्य घडेल. हे महत्त्वाचं पाऊल शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपायांसाठी भारतासाठी महत्त्वाचं आहे.

COMMENTS