Homeताज्या बातम्याविदेश

भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत जीममध्ये भोसकले

न्यूयार्क ः अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय विद्यार्थी जीममध्ये व्यायाम करत असताना त्या

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला स्थगिती
 वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा कोलमडली
दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन

न्यूयार्क ः अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय विद्यार्थी जीममध्ये व्यायाम करत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ही घटना आहे. वरुण राज असे 24 वर्षीय तरुणाचे नाव असून तो तेलंगणाचा आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. सरकारनेही मदतीचे आश्‍वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण राज गेल्याच वर्षी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला होता. वरुन वल्परायसो विद्यापीठात एमएसचे कॉम्पुटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.

COMMENTS