Homeताज्या बातम्यादेश

चीनच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य सज्ज – मनोज पांडे

बेंगळुरू/वृत्तसंस्था : चीन-भारत यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) कोणत्याही आपत्कालीन परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी भारत

बेंगळुरू/वृत्तसंस्था : चीन-भारत यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) कोणत्याही आपत्कालीन परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रविवारी केले. भारतीय सैन्याच्या स्थापना दिनानिमित्त कर्नाटकच्या बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये एलएसीवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर जवळपास एक महिन्यांनी लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे.

याप्रसंगी जनरल पांडे म्हणाले की, देशाच्या उत्तर सीमावर्ती भागात परिस्थिती सामान्य आहे आणि प्रस्थापित प्रोटोकॉल आणि विद्यमान यंत्रणांद्वारे शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. एलएसीवर भारत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे.त्याठिकाणी कठीण प्रदेश आणि खडतर हवामान असूनही, आमचे शूर जवान तेथे तैनात आहेत. त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे, उपकरणे आणि सुविधा पुरेशा प्रमाणात पुरवली जात आहेत. स्थानिक प्रशासन, इतर एजन्सी आणि लष्कराच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पायाभूत क्षेत्रात सुधारणा झाल्या झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी भारतीय सैन्याने सुरक्षेशी संबंधित आव्हानांचा खंबीरपणे सामना केला. तसेच देशाच्या सीमांची सक्रियपणे आणि जोरदारपणे सुरक्षा ठेवली. यासोबतच लष्कराने क्षमता विकास, सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. भविष्यातील युद्धांची तयारी आणखी मजबूत केल्याचे सैन्यप्रमुख म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका करताना पांडे म्हणाले की, देशाच्या पश्‍चिम सीमेवर नियंत्रण रेषेजवळील सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघनात लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी इथे वारंवार युद्ध विरामाचा भंग होत असे. त्याचप्रमाणे सीमेपलिकडून होणार्‍या घुसखोरीला आळा घालण्यात मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मिरातील नागरिकांनी हिंसाचार नाकारला असून विविध सरकारी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तेथील भागात विकासामुळे सकारात्मक बदल घडून येत आहेत. जम्मू-काश्मिरातील हिंसाचारात घट झाली असली तर काही दहशतवादी संघटना टार्गेट किलींग करताना दिसून येतात. असे प्रकार थोपवण्यासाठी सैन्यासह इतर सुरक्षा दले प्रयत्नरत असल्याचे सैन्य प्रमुखांनी स्पष्ट केले.

COMMENTS