होणार होणार अशी सारखी चर्चा विश्वभर सुरू असताना आज अखेर संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या विभागाने अधिकृतपणे भारताची लोकसंख्या आता जगात सर्वाधिक

होणार होणार अशी सारखी चर्चा विश्वभर सुरू असताना आज अखेर संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या विभागाने अधिकृतपणे भारताची लोकसंख्या आता जगात सर्वाधिक असल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. चीनची सध्याची लोकसंख्या १४२ कोटी ५७ लाख तर भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख एवढी सांगण्यात आली. काही वर्षापासूनच असे सांगण्यात येत होते की, चीनच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा भारतापेक्षा कमी असल्याने, आगामी काही वर्षात चीनची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकावर जाईल आणि भारताची लोकसंख्या ही जगात पहिल्या क्रमांकावर येईल. आज मी तिला भारताची लोकसंख्या ही चीन पेक्षा २५ लाखांनी अधिक आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रणाचे प्रयत्न जगात सर्वत्र केले जात असताना, भारतात मात्र लोकसंख्या सर्वाधिक होऊन नेमके काय प्रश्न वाढले, यासंदर्भात आता देशाला गंभीर चिंतन करावं लागेल. कोणत्याही देशात करत्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असणं ते त्या देशाच्या विकासाची एक बाजू म्हणून मोजली जाते. हे वर्गीकरण पाहता भारतातील एकूण लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या शून्य ते १४ वयोगटातील आहे. हे वयोगट म्हणजे पूर्णतः पालकांवर अस्तित असलेला वयोगट असतो मात्र या वयोगटात मृत्युदर कमी असणे हे विकसित देशात लक्ष नाही त्यामुळे ही लोकसंख्या २५% असणं हे त्या अर्थाने भारतातील वैद्यकीय सेवा – सुविधा या बऱ्यापैकी आहेत, असा त्याचा अर्थ होतो. १५ ते ६४ या कर्त्या वयोगटातील लोकसंख्या ही सर्वाधिक म्हणजे ६७% एवढी आहे. ६४ वर्षापेक्षा अधिक वयाची असणारी लोकसंख्या ही देशात सात टक्के एवढी आहे. या टक्केवारीच्या भगता बाकी लोकसंख्या ही बाल वयापेक्षा थोड्या अधिक वयाची किंवा कुमारवयीन युवकांची आहे. जगातल्या लोकसंख्या तज्ञांच्या मतानुसार भारताची लोकसंख्या ही 165 कोटी लोकसंख्येपर्यंत वाढत जाईल आणि त्यानंतर या लोकसंख्येमध्ये घट सुरू होईल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. भारताच्या या सर्वाधिक लोकसंख्येचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे की, देशातील केरळ आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे; तर, उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या भारतातील पंचवीस कोटी चाळीस लाख युवक हे १५ ते २४ या वयोगटात आहे. त्यामुळे या वयोगटात असलेल्या तरुणांमुळे भारतात आगामी काळात वेगवेगळ्या प्रकारे नव विचारांची, नवसंशोधनाची एक लाट निर्माण होईल, असा संकेतही लोकसंख्या तज्ञ देत आहेत. मात्र यासाठी श्री स किंवा मुलींना शिक्षणाची समान संधी आणि त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी देऊन त्यांच्या स्किल चा योग्य वापर करून घेणे अपेक्षित आहे कारण १५ ते २४ वयोगटातील २५ कोटी ४० लाख लोकसंख्येत मुलींची किंवा तरुणींची संख्या ही जवळपास निम्म्या एवढी आहे. त्यामुळे एवढ्या शक्तीचा विधायक विचार करून त्यांना संधी दिल्याशिवाय देशाला सक्षम होणे अवघड राहील; असा इशाराही जागतिक लोकसंख्या तज्ञांनी दिला आहे. चीन हा अनेक दशके लोकसंख्या विषयावर जगात आघाडीवर होता त्यामुळे त्यांनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी अनेक उपाय योजले. मात्र, आता लोकसंख्या नियंत्रित झाली. जागतिक पातळीतील दुसऱ्या क्रमांकावर आली. मात्र, आजपासून वीस वर्षानंतर चीनमध्ये युवाशक्ती ही फार कमी होईल, असा अंदाज लोकसंख्या तज्ञांना असल्यामुळे चीनने देखील या संदर्भात आगामी काही वर्षांमध्ये चीनची युवा लोकसंख्या घटेल, यामुळे त्यासाठीही आतापासून नियोजन सुरू केले आहे.
COMMENTS