Homeताज्या बातम्यादेश

भारताची रशियन तेल खरेदीत कपात

व्हेनेझुएलाशी चर्चां सुरू असल्याचा सर्जियो गोर यांचा दावानवी दिल्ली: जागतिक ऊर्जा बाजारात एक मोठा बदल होत आहे. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी

आ. रोहित पवारांच्या माध्यमातून उद्या विकासकामांचे भूमिपूजन
महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांकडून बंदोबस्तांची पहाणी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर ते नागपूर विशेष ट्रेन धावणार

व्हेनेझुएलाशी चर्चां सुरू असल्याचा सर्जियो गोर यांचा दावा
नवी दिल्ली: जागतिक ऊर्जा बाजारात एक मोठा बदल होत आहे. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी कमी करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर यांच्या मते, भारत आपल्या ऊर्जा खरेदीमध्ये विविधता आणत असून, व्हेनेझुएलाशी तेल खरेदीबाबत चर्चांना प्रारंभ केला आहे. मात्र याबाबत भारत सरकारकडून अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या व्यापार करारानंतर हा धोरणात्मक निर्णय घेतला गेला आहे. या करारानुसार, भारताने रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ दरम्यान सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यासाठी काम करत आहे आणि व्हेनेझुएलासोबत तेल खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, तेल खरेदीवर एक सहमती झालेली आहे आणि अमेरिका कोणत्याही देशाने रशियाकडून तेल खरेदी करणे टाळावे, अशी भूमिका घेत आहे. ही भूमिका फक्त भारतापुरती मर्यादित नाही, असे गोर यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील या मुद्द्यावर स्पष्ट दृष्टिकोन आहे. ट्रम्प यांच्या मते, युद्धाचा अंत होण्याची आवश्यकता असून, शांततेच्या दिशेने सर्व हालचाली थांबवाव्यात. 2 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या व्यापार कराराची घोषणा केली होती. त्यांनी ’ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत आणि व्हाईट हाऊसच्या निवेदनाद्वारे दावा केला की, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करण्यास आणि शेवटी ते थांबवण्यास सहमत झाला आहे. तथापि, भारताने या कराराबाबत अधिकृतपणे काही खुलासा केलेला नाही. तरीही, नवी दिल्लीने व्हेनेझुएलासोबत इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

COMMENTS