Homeताज्या बातम्यादेश

हवामान बदलाबाबत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या पाच देशांमधे भारताचा समावेश

नवी दिल्ली : हवामान बदला संदर्भातील कामगिरीच्या आधारे भारताला जगातील पहिल्या 5 देशांमध्ये तर जी 20 देशांमध्ये सर्वोत्तम स्थान मिळाले आहे. जर्मनीत

राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे
कार्यकर्ता हेच पक्षाचे बलस्थान आहे : प्रवीण दरेकर
अकोले तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक

नवी दिल्ली : हवामान बदला संदर्भातील कामगिरीच्या आधारे भारताला जगातील पहिल्या 5 देशांमध्ये तर जी 20 देशांमध्ये सर्वोत्तम स्थान मिळाले आहे. जर्मनीतील न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट क्शन नेटवर्क इंटरनॅशनलच्या, जर्मन वॉचने प्रकाशित केलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकानुसार (सीसीपीआय, 2023) भारताने 2 स्थानांची झेप घेतली, आता तो 8 व्या क्रमांकावर स्थानापन्न झाला आहे.
कॉप 27 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या सीसीपीआयच्या ताज्या अहवालात डेन्मार्क, स्वीडन, चिली आणि मोरोक्को हे फक्त चार छोटे देश, भारतापेक्षा पुढे असून, अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणत्याही देशाला मिळवता आला नाही. त्यामुळे सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान सर्वोत्तम आहे. भारताने, हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर श्रेणींमध्ये, तसेच हवामान धोरण आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी एक माध्यम म्हणून उच्च मानांकन मिळवले. नवीकरणीय ऊर्जा जलद उपयोजन आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या कार्यक्रमांसाठी भक्कम आराखड्याच्या दिशेने भारताच्या आक्रमक धोरणांचा लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. सीसीपीआयच्या अहवालानुसार, भारत आपले 2030 उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर (2ओउ च्या खाली असलेल्या परिस्थितीशी सुसंगत) अग्रेसर आहे.सीसीपीआयच्या मानांकन यादीत पहिल्या दहामधे, भारत हा एकमेव जी-20 मधील देश आहे. भारत आता जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.

COMMENTS