Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसन वीर मध्ये सत्तांतर; सत्ताधारी पॅनेलचा धुरळा

सातारा / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पा

सैन्य भरतीसाठी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ; युवकाचे अपहरण
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील

सातारा / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी एकतर्फी सत्तांतर करत सत्ताधार्‍यांची हवा काढून टाकली. कारण किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विजयी कपबशीने विमानाला आकाश न दाखवता जमीनीवरच आपटले. विजयानंतर किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार व कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले आणि कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल अशी लढत झाली. पहिल्या फेरीपासून सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलला धक्के बसत गेले. अखेर सर्वच्या सर्व जागांवर पराभव झाल्याने सत्ताधार्‍यांचा गड कोसळला अन् मतदारांनी सत्तांतर घडवले. या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी वाईतील श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी येथे पार पडली.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : गट 1 – कवठे खंडाळा ऊस उत्पादक – चिन्ह- कपबशी (विजयी)- रामदास (बाळासाहेब) गाढवे, नितीन पाटील-जाधव, काळोखे किरण. गट 2 – भुईंज ऊस उत्पादक -चिन्ह- कपबशी (विजयी)- प्रकाश धरगुडे, रामदास इथापे, प्रमोद शिंदे. गट 3 – बावधन ऊस उत्पादक- दिलीप पिसाळ, शशिकांत पिसाळ, हिंदुराव तरडे. गट 3 – सातारा ऊस उत्पादक – संदीप चव्हाण, सचिन जाधव, बाबासाहेब कदम. गट 3 – कोरेगाव ऊस उत्पादक – ललित मुळीक, संजय फाळके, सचिन साळुंखे. महिला राखीव गट- सरला श्रीकांत वीर, सुशीला भगवानराव जाधव. सोसायटी मतदारसंघ- आ. मकरंद पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती- हणमंत चवरे, अनुसूचित जाती जमाती – संजय कांबळे, इतर मागासवर्ग प्रवर्ग- कपबशी (विजयी)- आनंदा जमदाडे.
पराभूत उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : दत्तात्रय गाढवे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, माजी आमदार मदन भोसले, दिलीप शिंदे, जयवंत पवार, अपक्ष- मानसिंग शिंगटे, सचिन भोसले, विश्‍वास पाडळे, चंद्रसेन शिंदे, चंद्रकांत इंगवले, भुंजगराव जाधव, अनिल वाघमळे, अपक्ष- नवनाथ साबळे, मेघराज भोईटे, नवनाथ केंजळे, शिवाजी पवार, अपक्ष- दिलीप जाधव, रमेश माने, आशा दत्तात्रय फाळके, विजया जयवंत साबळे, रतनसिंह शिंदे, काळे चंद्रकांत, सुभाष खुडे, शिवाजी जमदाडे.

COMMENTS