Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अध्यक्ष-कार्याध्यक्षांचा मनमानी कारभार; इस्लामपूर युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामे देणार?

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना युवकांना प्रमोट करीत आहेत. इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदा

इस्लामपूर शहरातील 3 कोटी 45 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन
वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम
शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना युवकांना प्रमोट करीत आहेत. इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची पक्षातच घुसमट होत आहे. युवक कार्यकारिणीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचे अस्त्र उगारले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील युवक राष्ट्रवादी कार्यकारणी मध्ये खदखद सुरू आहे. पदाधिकारी नाराज होत असल्याने राष्ट्रवादी समोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
एकीकडे भाजप-शिवसेना युवकांना महत्त्व देत असताना दुसरीकडे मात्र इस्लामपूरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक कार्यकारिणीच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी तर्फे शहरातील कोणताही कार्यक्रम असला तरी युवक कार्यकारिणीला या कार्यक्रमाची कल्पनाही नसते. अचानकपणे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याकडून फोन किंवा मोबाईल व ग्रुपवर एसएमएस करून कार्यक्रमाबाबत कळवले जात आहे. कार्यक्रमास युवकांना घेऊन येण्यास सांगत आहेत. मात्र, अचानकपणे सांगितल्याने युवकांचे संघटन होत नाही. त्यामुळे कार्यक्रमास युवकांची संख्या कमी असते. याचे खापर अध्यक्ष व कार्याध्यक्ष हे कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यावर फोडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी तर्फे शिवप्रताप गरुड झेप या सिनेमाच्या तिकिटावरून कार्याध्यक्ष यांनी मारहाण केली असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावरूनच राष्ट्रवादी युवक कार्यकारणीमध्ये अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा मनमानीचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा कारभारामुळे पक्षाचे काम करताना पदाधिकार्‍यांची घुसमट होत आहे.
शहरांमध्ये एखादा कार्यक्रम अथवा उपक्रम राबवत असताना युवक कार्यकारणीची बैठक घेतली जात नाही. बैठक घेतली तर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी प्रतीकदादांना विचारले आहे का? असा प्रश्‍न केला असता अध्यक्ष व कार्याध्यक्ष हे दादांना विचारूनच कार्यक्रम घेतला आहे असे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष प्रतीक पाटील यांना या कार्यक्रमाबाबतच्या बैठकीचे काहीही माहिती नसते. तसेच प्रतीक पाटील यांच्यापर्यंत पक्षासाठी खाली काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पोहोचू ही दिले जात नाही. यामुळे पदाधिकार्‍यांच्या मध्ये नाराजी पसरली आहे. परंतू या पदाधिकार्‍यांची आ. जयंत पाटील व प्रतीक पाटील यांच्यावर नाराजी नसून अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यावर आहे. तरी यावर प्रतिक पाटील यांनी स्वतः लक्ष घालून पदाधिकार्‍यांच्या अडचणी समजून घेऊन नाराजी दूर करावी, असे पदाधिकार्‍यांच्यातून बोलले जात आहे.
इस्लामपूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यात नाराजी आहे. अध्यक्षासह कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभाराबद्दल प्रतीक पाटील यांच्याकडे पदाधिकार्‍यांनी तक्रार केली आहे. युवक कार्यकारणीतील पाच ते सातजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. यावर प्रतिक पाटील हेच काहीतरी तोडगा काढतील, असे इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादीचे संघटक सागर जाधव यांनी बोलताना सांगितले.

COMMENTS