Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरमध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बेलापूर/प्रतिनिधी ः स्वातंत्रदिनानिमित्त बेलापूर व परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. बेलापूरच्या मुख्य चौकातील ध्वजारोह

नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
बंधार्‍यावरून लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद
संगमनेर शहराला पावसाने झोडपले

बेलापूर/प्रतिनिधी ः स्वातंत्रदिनानिमित्त बेलापूर व परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. बेलापूरच्या मुख्य चौकातील ध्वजारोहण सरपंच महेंद्र साळवी व ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. बेलापूर पोलिस स्टेशन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर बेलापूर ग्रामपंचायत येथे सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते तर बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मेजर निलेश अमोलीक यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी मुलांची शाळा व मराठी मुलींची शाळा येथील ध्वजारोहण माजी सैनिक शरद देशपांडे व ईस्माईल शेख यांच्या शुभहस्ते तर जिल्हा परिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांनी अलिया सर्फराज सय्यद झिनत शफीक आतार जवेरीया सर्फराज सय्यद अदिबा एजाज आतार व फातीमा अझरुद्दीन सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. जे. टी. एस हायस्कूल येथील ध्वजारोहण नंदु खटोड व मुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी यांच्या शुभहस्ते बेलापूर सिनियर महाविद्यालयाचे ध्वजारोहण शेखर डावरे व राजेश खटोड याच्या हस्ते करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती बेलापूर येथील ध्वजारोहण खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांच्या हस्ते नगर अर्बन बँकेचे ध्वजारोहण जेष्ठ नागरिक कनजी टाक यांच्या हस्ते तर श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलचे ध्वजारोहण मेजर संतोष निकम यांच्या हस्ते तर ऐनतपूर येथील मराठी शाळा अमोलीक वस्ती येथील ध्वजारोहण मेजर सुजीत शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच विविध पतसंस्था अंगणवाडी बँका प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही ध्वजारोहण संपन्न झाले. मुख्य झेंडा चौकातील ध्वजारोहण करण्यापूर्वी उर्दू शाळेतील मदिहा ईकबाल शेख हीने  ऐ मेरे वतन के लोगो हे गीत म्हटले. बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सैनिक माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचा परिवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS