Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुधाच्या दरासाठी कोतुळेमध्ये बेमुदत धरणे आंदोलन

अकोले : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने कोतुळ (ता अकोले) येथे शेतकर्‍यांच्या दूधाला 40 रुपये भाव मिळावा व शेतकर्‍यांचे सम्प

अहमदनगरच्या पत्रकारितेला काळिमा फासणारे ते बोगस पत्रकार कोण ?
मराठी भाषाशुद्धीचे प्रथम प्रवर्तक छत्रपती शिवराय – डॉ. बाबुराव उपाध्ये
राहुरीत गोल्डन ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

अकोले : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने कोतुळ (ता अकोले) येथे शेतकर्‍यांच्या दूधाला 40 रुपये भाव मिळावा व शेतकर्‍यांचे सम्पूर्ण कर्ज माफ करावे यासाठी शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अनेक शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेतला. सकाळी 11.00 वाजेपासुन कोतूळ खटपट नाका या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले.
यावेळी शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज अटी-शर्ती न लावता माफ करा , 3.5/8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 40 रू. भाव द्या,  खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करा, दूधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी व रिव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करा,  खाजगी व सहकारी दूध संघांना लागू (होईल असा लुटमार विरोधी कायदा करा,  राज्यात दूग्ध मुल्य आयोगाची स्थापना करा, कठोर पावले टाकून सर्व प्रकारची दूध भेसळ बंद करा, अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करा..दूध पावडर आयात बंद करा व दूध पावडर निर्यातीला प्रोस्ताहन द्या. एस.एन.एफ. कटींग व एस.एन.एफ. वाढीचे दर समान ठेवा. सरकारी निधीतुन मोफत पशु जीवन विमा व पशु आरोग्य विमा योजना राबवा. पशु खाद्याचे भाव कमी करा. पिंपळगांव खांड या ठिकाणी डोकेवस्ती परीसरातील पात्र वनजमिन धारकांना पिंपळगांव खांड धरणातुन पाणी परवाने द्या. व आदिवासी प्रकल्प विभागाकडून विद्युत पंप व पाईपलाईनची सुविधा द्या. या  मागण्या साठी हे  बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी नामदेवराव साबळे संजय आरोटे, संतोष शेटे कॉ.डॉ.अजित नवले, कॉ. सदाशिव साबळे, सागर शेटे, डॉ. बाळासाहेब देशमुख, विनोद देशमुख, रवि आरोटे, राजू चौधरी, प्रशांत देशमुख, संदिप डोंगरे, बाळासाहेब लांडे, रामदास वायळ, सागर गोडे, पांडूरंग कचरे, किरण देशमुख अभिजीत देशमुख, बन्टी बोर्‍हाडे, भाऊसाहेब देशमुख, सुभाष देशमुख, संजय साबळे, अरूण भोर, गणेश जाधव, राजेंद्र पवार, अमित घोलप, बाळासाहेब का. देशमुख, अभिजीत देशमुख (बबलू), रामनाथ गंभिरे, भाऊसाहेब औटी आदी आंदोलनात सहभागी  झाले.

COMMENTS