Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये वाढला निपाहचा धोका वाढला

गावे कंटेनमेंट झोनमध्ये, शाळा-कार्यालये बंद

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनानंतर पुन्हा एकदा देशावर निपाह या नव्या विषाणूचा धोका वाढतांना दिसून येत आहे. कारण केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणा

परदेशातून सातारा जिल्ह्यात आलेले 33 जण बेपत्ता; प्रशासन चिंतेत
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल
यशाच्या शिखरावर असलेल्या टिम इंडियाचा शेअर बाजार एकाएकी कोसळला कसा ?                

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनानंतर पुन्हा एकदा देशावर निपाह या नव्या विषाणूचा धोका वाढतांना दिसून येत आहे. कारण केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा विषाणूही संसर्गजन्य असल्याने केरळमधील काही गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने निर्बंध आणि उपाययोजनाही जाहीर केल्या आहेत.
केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार लोकांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. बाधित भागातील काही शाळा आणि कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत. यापूर्वी केरळमध्ये 2018 आणि 2021 मध्ये निपाह संसर्गाचा उद्रेक झाला होता. केरळच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, आतापर्यंत 140 हून अधिक लोकांची निपाह विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे. विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बाधित भागातील सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अटांचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टीयाडी, कयाकोडी, विलेपल्ली आणि कविलुमपारा या गावांचा त्यात समावेश आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या सात ग्रामपंचायतींच्या 43 वॉर्डांमध्ये आणि बाहेर कोणालाही प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या क्षेत्रांत पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तू आणि औषधांची विक्री करणार्‍या दुकानांना मात्र या क्षेत्रांत परवानगी असेल. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर आरोग्य केंद्रे आणि औषधविक्रेत्यांसाठी वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. या क्षेत्रांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम कार्यालयांना कमीत कमी कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, बँका, इतर सरकारी किंवा निम-सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांनी मास्क घालावे, अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरावे आणि सामाजिक अंतर राखावे. राष्ट्रीय महामार्गावरुन धावणार्‍या कोणत्याही बसेस किंवा वाहनांना बाधित भागात थांबू दिले जाणार नाही.

COMMENTS