प्रभाग रचनेतील बदलाने राजकीय आराखडे बदलणारइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेव
प्रभाग रचनेतील बदलाने राजकीय आराखडे बदलणार
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक येन केन प्रकारे प्रभागात चर्चेत राहत आहेत. शासन निर्णयानंतर पालिकेत पाच नगरसेवकांची वाढ होणार आहे. वाढलेल्या जागा कोणाच्या पथ्यावर पडणार? याची चर्चा सुरू आहे.
सध्या पालिकेत 28 नगरसेवक आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर युवा कार्यकर्ते कोणाच्या बाजूला झुकले आहेत हे समजायला मार्ग नाही. त्यामुळे नेते मंडळी संभ्रमात आहेत. प्रभाग रचनेत बदलाने इच्छुक उमेदवारांची राजकीय आराखडे बदलले आहेत. प्रभागात आपल्यासोबत कोणाची उमेदवारी घेतल्यास फायदा होईल यासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे.
राष्ट्रवादी व विकास आघाडीने प्रस्तावित विकास कामांचा प्रारंभ करण्याचा धडाका लावला आहे. गत निवडणुकीत भुयारी गटार योजनेची सुरूवात करण्यात आली होती. ती योजना अपूर्ण राहिल्याने कळीचा मुद्दा बनली आहे. योजना रखडल्याने शहरातील रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. उपनगरातील मुलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.
प्रभागनिहाय भेटीगाठीवर भर…..
दिवाळीच्या निमित्ताने आजी-माजी नगरसेवकांनी मतदारापर्यंत मिठाई, साखर, तेल, भेट वस्तू घरपोच केल्या जात आहेत. मात्र, पक्षांच्या आणि काही नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे मतदार नाराज असल्याची चर्चा प्रत्येक प्रभागात आहे. याचा फटका निवडणुकीत पक्षाला बसू नये यासाठी पक्षांच्या नेत्याकडून प्रभागनिहाय भेटी-गाठी वरती भर दिला आहे.
COMMENTS