ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरास

हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीची स्थापना
ग्रंथ वाचनामुळे बौद्धिक समृद्धी वाढते
विरोधी पक्षनेता ठरेल त्यादिवशी काँग्रेसमध्ये स्फोट ः दरेकर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम हे स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात मदत करतील असे ते म्हणाले.

याविषयीच्या ट्विट मालिकेत पंतप्रधान म्हणाले, “ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. हे नियम विश्वास आणि स्वयं-प्रमाणीकरणाच्या पायाभूत तत्वावर आधारित आहेत. मंजुरी, अनुपालन आवश्यकता आणि प्रवेशातील अडथळे यात लक्षणीयरीत्या घट झाली आहे.

ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठी मदत करतील. अभिनवता आणि उद्योगांसाठी ते नव्या संधी खुल्या करतील. भारताला ड्रोन हब बनवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन , तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील भारताच्या सामर्थ्याचा लाभ मिळवण्यास ते मदत करेल. “

COMMENTS