Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ

श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई ः शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याने मालेगाव पोलिस ठाण्या

मुजोर रिक्षा वाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या लगावली कानशिलात | LokNews24
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
राणेंच्या वक्तव्याचे नाशकात पडसाद; भाजप कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

मुंबई ः शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याने मालेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. तोच आता ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांना देखील घेरण्याचे काम महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे. मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सुषमा अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर सुषमा अंधारे यानांही पोलिस पाचारण करणार आहेत, अशी माहिती तपास अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

COMMENTS