सर्वसमावेशक निवडणुका लोकशाहीची खरी ओळख

Homeताज्या बातम्यादेश

सर्वसमावेशक निवडणुका लोकशाहीची खरी ओळख

मुख्य निवडणूक आयुक्त पांडे

नवी दिल्ली : निवडणूक व्यवस्थापन संस्थांची भूमिका, रचना आणि क्षमता’ या विषयावर नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, भारताचे

मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट – संजय राऊत
उदगीर भाजपच माजी सभापती शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये
आंदोलन करताच बसस्थानका समोरील परिसर झाला दुर्गंधीमुक्त

नवी दिल्ली : निवडणूक व्यवस्थापन संस्थांची भूमिका, रचना आणि क्षमता’ या विषयावर नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार(Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे(Anup Chandra Pandey) यांनी केले.
डिसेंबर 2021 मध्ये आयोजित ’समिट फॉर डेमोक्रसी’ च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगातर्फे स्थापन करण्यात आलेल्या कोहोर्ट ऑन इलेक्शन इंटेग्रिटी अंतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, सुलभ आणि प्रलोभनमुक्त निवडणुका हे लोकशाहीप्रधान राजकारणाच्या पायाभरणीचे घटक असून, शांतता आणि विकासात्मक लाभांसाठी ती पूर्वअट आहे. या संकल्पनेनुसार सार्वभौमत्व हे देशाच्या लोकांशी निगडीत असते आणि ते त्यांच्याच माध्यमातून साध्य होते, हे समजून घेतले पाहिजे. भारतातील लोकशाहीची कल्पना अधोरेखित करताना राजीव कुमार यांनी सांगितले की लोकशाही हा नेहमीच भारतीय जनमाननसाचा, जीवनशैलीचा एक भाग राहिला आहे. वैविध्यपूर्ण मते, संवाद, चर्चा, समायोजन हे आपल्या संस्कृतीचे अंगभूत घटक आहेत. निवडणुकीच्या निकालांवर लोकांचा विश्‍वास हा निरोगी लोकशाहीचा सर्वात मूलभूत नियम आहे, असेही ते म्हणाले. जनतेच्या सामूहिक इच्छेचे प्रामाणिक प्रतिबिंब असणार्‍या सर्वसमावेशक निवडणुका, ही लोकशाहीची खरी ओळख आहे, असे त्यांनी सांगितले. परिषदेच्या संकल्पनेच्या महत्त्वावर भर देत राजीव कुमार म्हणाले की ’निवडणूक व्यवस्थापन संस्थांची भूमिका, रचना आणि क्षमता’ या बाबी निवडणुकांच्या विश्‍वासार्हतेच्या दृष्टीने महत्वाचे घटक आहेत कारण त्यात निवडणूकीवर आधारित लोकशाहीच्या मूलभूत आणि कार्यात्मक बाबींचा समावेश होतो. या परिषदेच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी भारतीय निवडणुक आयोगाचे निवडणूक व्यवस्थापनातील कौशल्य जागतिक लोकशाहींसोबत सामाईक करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. या परिषदेला संबोधित करताना, भारतासोबतचे संबंध सर्वात परिणामकारक आहेत, असे मत अमेरिकेच्या एलिझाबेथ जोन्स यांनी व्यक्त केले. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच जगभरात शांतता, सुरक्षा आणि समृद्धी नांदावी, यासाठी सहकार्य करण्यासाठी ही भागीदारी अधिक मजबूत होत आहे, असे त्या म्हणाल्या. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी लोकशाही संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी, मतदार शिक्षण आणि जनजागृतीसाठी सहकार्य आणि भागीदारी या संकल्पनेवर आधारित, तसेच निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या उत्कृष्ट उपक्रमांचा समावेश असणार्‍या व्हॉईस इंटरनॅशनल या भारतीय निवडणुक आयोगाच्या मासिकाच्या नव्या आवृत्तीचे अनावरणही करण्यात आले

COMMENTS