Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून रुग्णसेवां करीत असलेल्या मुंबई नाक्यावरील नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत अ

नारायणी हॉस्पिटलच्या वर्धापनदिनी  नामवंत डॉक्टरांची तपासणी मोफत
नारायणी हॉस्पिटल तर्फे गामने मैदानावर उद्या आरोग्यावर मॉर्निंग टीप्स
नारायणी हॉस्पिटल तर्फे आरोग्यावर मॉर्निंग टीप्स

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून रुग्णसेवां करीत असलेल्या मुंबई नाक्यावरील नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत अंबड एमआयडीसीतील डोंगरावर ग्रीन रीव्हल्यूएशन फाऊंडेशन टीमच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वाक्यानुसार निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रदूषण विरहित जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्पिटलचे प्रसिद्ध मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. पंकज राणे, श्वसनविकार तज्ञ डॉ. स्वप्निल साखला मेंदुविकार तज्ञ डॉ. आनंद दिवाण, लेप्रोस्कोपी तज्ञ डॉ. दिनेश जोशी, किडनीविकार तज्ञ डॉ. देवीकुमार केळकर, सांधेबदल तज्ञ डॉ. मनीष चोकसी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मयुरी केळकर, कॅन्सर तज्ञ डॉ. अजय जाधव बालरोग तज्ञ डॉ. दीपा जोशी, पंचकर्म तज्ञ डॉ. मोनाली राणे यांनी दिली.

यावेळी नारायणी हॉस्पिटल तर्फे 51 रोपांची लागवड करण्यात आली. व्यवस्थापक प्रशांत जोशी, जितेंद्र येवले,  सुबोध मराठे, विलास झाल्टे

यावेळी सर्व डॉक्टर्स तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS