बीड प्रतिनिधी - वेगवान निर्णय, गतीमान प्रशासन या ध्येयाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेल्या विकास
बीड प्रतिनिधी – वेगवान निर्णय, गतीमान प्रशासन या ध्येयाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेल्या विकासाला चालना दिली आहे. आपल्या बीड विधानसभा मतदार संघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विशेष लक्ष असते. विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडणार नाही. हा विकास रथ असाच वेगाने चालेल असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुरुवारी केतुरा येथील 50 लक्ष रु.च्या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले. तालूक्यातील केतुरा येथील सरपंच परमेश्वर नाना तळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त गावात विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी शिवसेनेचे गोवर्धन काशिद सर, सखाराम मोहिते, हनुमान जाधव,योगेश काशिद,अध्यक्ष सांगुळे, विकास गवते, डॉ.संकेत बाहेती, डॉ.संतोष धुत, ग्रामसेवक राजेंद्र मस्के आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी केतुरा येथील सरपंच परमेश्वर नाना तळेकर यांचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, बीड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशिल आहोत. आज केतुरा येथील हे 50 लक्ष रु.ची विकास कामे अत्यंत दर्जेदार होणार आहेत. प्रशासनाकडे विकास कामांबद्दल नेहमीच पाठपुरावा केला जात आहे. जनतेला पाहिजे तो विकास नक्कीच केले जाईल. विकास निधीसाठी आपण कुठेही कमी पडणार नाहीत. केतुरा येथील ही विकासाची कामे अधिक दर्जेदार पध्दतीने आणि वेगाने पुर्ण करण्यासाठी आपण स्वत: लक्ष देवूत असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले. गाव पातळीवरील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याची जिम्मेदारी नक्कीच पार पाडू. प्रत्येक गावाला आणि प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असे काम आपण सर्वजण करु दाखवू. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील विकास रथ वेगाने दौडत असल्याचे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.या कार्यक्रमास केतुरा भागातील शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS