केज प्रतिनिधी - मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे उद्घाटन दि.2 मे 2023 रोजी नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले.
केज प्रतिनिधी – मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे उद्घाटन दि.2 मे 2023 रोजी नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले. मात्र या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे नगरसेवकांची अनुपस्थिती असल्याचे स्थानिक नागरिकांची चर्चा ऐकायस मिळाली आहे.
केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा व इतरही उर्वरित प्रभागाला जोडणारा उमरी रस्ता हा मागच्या काही वर्षापासून अतिशय दुर्लक्षित होता.मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहने तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा मुश्किल झालेले होते.मागच्या अनेक वर्षांपासून सदरील रस्ता करण्यात यावा यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली.मात्र कित्येक वर्षापासून प्रश्न हा प्रलंबित होता.परंतु मंगळवारी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड तसेच मुख्याधिकारी महेश गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले,नगरसेवक मुस्तफा खुरेशी, नगरसेवक राजूभाई इनामदार, नगरसेवक भाऊसाहेब गुंड,बाळासाहेब गाढवे,ओम रांजनकर,खेसर इनामदार, नगरसेवक पद्मिन शिंदे,नगरसेवक सुग्रीव कराड,नगरसेवक जलाल इनामदार,शेख सादेक,हाजी बॉस, सुमित बप्पा शिंदे, लहू जाधव आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व पत्रकार दत्तात्रय हंडीबाग,तात्या रोडे,व नगरसेवक यांच्यासह या भागातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. सदरील रस्त्याचे प्रत्यक्ष काम हे येत्या दोन ते तीन दिवसात सुरु करण्यात येईल असे यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
22 वर्षाचा प्रश्न हा हारून भाईने सोडवला…
केज शहरात विकासा बाबत आतापर्यंत चा इतिहास आहे,ज्या-ज्या वेळेस हारून भाई इनामदार सत्तेत होते. त्या-त्या वेळेस उमरी रोड च काम झालेले आहे. 2010 साली सत्ता आली त्यावेळी 10 लक्ष रुपये टाकून उमरी रोडचा कच्चा रस्ता केला होता. 22 वर्षाचा संघर्षच हा हारून भाईने सोडवला व प्रवेशद्वारापासून 4 ते 5 फुटाचा रस्ता होता तो 30 फुटाचा केला होता. तात्कालीन आमदार ठोंबरे यांच्याकडून दहा लक्ष रुपयेचा निधी घेऊन प्रवेशद्वारापासून काही अंतरापर्यंत सिमेंट रस्ता केला होता.केजच्या उमरी रोडच्या विकासासाठी इतिहासात आतापर्यंत एकमेव जे नाव होते ते म्हणजे हारुन भाई इनामदार
केज शहरात विकास कामाला सुरुवात-बनसोड
शहरातील रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्पा हा नगरपंचायतला आलेल्या 98 लाख रुपयांच्या निधीमधून होईल तर उर्वरित जो रस्ता आहे. तो आमदार नमिताताई मुंदडा यांच्या आमदार फंडातून होणार असल्याची माहिती केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी दिली.
आमच्या आंदोलनाला यश-प्रा.भोसले
केज शहरातून जाणारा उमरी रस्त्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली पण आजपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नव्हती,मागच्या अनेक वर्षांपासून सदरील रस्ता करण्यात यावा यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली.मात्र कित्येक वर्षापासून प्रश्न हा प्रलंबित होता.परंतु मंगळवारी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड तसेच मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झाले.आमच्या आंदोलनाला यश आले असे प्रा.हनुमंत भोसले म्हणाले.
वार्ड क्रं.8 चा चेहरा मोहरा बदलणार-आलिया इनामदार
शहरातील वार्ड क्रमांक 8 च्या विकासाबाबत नगरसेविका आलिया हारून इनामदार यांनी वार्ड क्रमांक 8 मध्ये 200 लक्ष रुपयाचे विकास कामे सुरू झाले असून येणार्या काळात कोणतेही काम शिल्लक राहणार नाही यांची दक्षता घेऊन वार्ड क्रमांक 8 चा चेहरा मोहरा बदलणार असे मत नगरसेविका आलिया हारून इनामदार यांनी प्रतिनिधीशी बोलताना वक्त केले.
COMMENTS