Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात

फलटण /प्रतिनिधी : मौजे गिरवी (हराटी मळा) येथे वस्तीलगत ऊसात लपुन बसलेल्या एका तरसास वनक्षेत्रपाल कार्यालय फलटण येथील अधिकारी व कर्मचारी यांनी पकड

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा आ. जयंत पाटील यांना पाठिंबा
आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा
सातारा जिल्ह्यातील वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट

फलटण /प्रतिनिधी : मौजे गिरवी (हराटी मळा) येथे वस्तीलगत ऊसात लपुन बसलेल्या एका तरसास वनक्षेत्रपाल कार्यालय फलटण येथील अधिकारी व कर्मचारी यांनी पकडून तपासणी आरोग्य तपासणी करून त्यास अधिवासात सोडण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वनक्षेत्रपाल कार्यालय फलटण येथील फलटण परिमंडळातील मौजे गिरवी (हराटी मळा) या ठिकाणहुन निखिल राजेश जाधव (रा. गिरवी) यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय फलटण येथे भ्रमणध्वनी वरून संपर्क करून तरस हा वन्यप्राणी सुरेश नानासो निकाळजे (रा. गिरवी, हराटी मळा) यांचे लोकवस्ती नजीक असलेल्या मालकी क्षेत्रातील ऊसात लपुन बसला असल्याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व वन्यजीव संरक्षक व संशोधन संस्था सातारा चे सदस्य सर्वजण मिळुन जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी तरस हा वन्यप्राणी ऊसात बसलेला दिसून आला. वनक्षेत्रपाल फलटण यांनी या ठिकाणी उपस्थित लोकांना घडलेल्या घटनेबाबत माहिती विचारली असता सकाळच्या प्रहारामध्ये दोन तरस एकमेकांशी भांडताना दिसले. नंतर काही वेळात त्यापैकी एक तरस लोकवस्तीत येत असताना दिसल्याने जमावाने त्यास हुसकावण्यास सुरूवात केली. त्यामुळे तरस दमून ऊसाच्या शेतात जाऊन बसला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यानंतर वनाधिकारी व संशोधन संस्था सातारा चे सदस्यांनी एकाविचाराने हा तरस ऊसातुन हुसकावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास तयार झाले. परंतू नजीकच असलेल्या लोकवस्तीमुळे व लोकांच्या विनंतीवरून तरस पकडून ताब्यात घेण्यास सांगितले. त्यावेळी तरस हा वन्यप्राणी ताब्यात घेऊन वनविभाग कार्यालय फलटण येथे आणला. उपवनसंरक्षक सातारा एम. एन. मोहिते यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा श्रीमती आर. ए. व्होरकाटे यांचे मार्गदर्शनानुसार तरस या वन्य प्राण्यांचे पशूवैद्यकीय अधिकारी फलटण यांच्याकडून तंदुरूस्त असलेची खात्री करून त्यास दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याचे वनक्षेत्रपाल मारूती निकम यांनी सांगितले.
वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. वनविभागातील वनक्षेत्रात वनवे लावण्याचे प्रकार घडत आहेत. वनवे लागल्याने अनेक जीव यामध्ये नष्ट होत आहेत. जनतेला विनंती आहे की, वनाचे संरक्षण करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. वणवा लावून वनांचे नुकसान करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

मारूती निकम (वनक्षेत्रपाल फलटण.)

COMMENTS