सकाळीच कोणीतरी कोणतीही झंजट मागे लावील…; इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केला उद्वेग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकाळीच कोणीतरी कोणतीही झंजट मागे लावील…; इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केला उद्वेग

अहमदनगर/प्रतिनिधी : मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात. परंतु न

LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
नगरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत ; दुरुस्ती कामासाठी सहा तास उपसा बंद
तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यश

अहमदनगर/प्रतिनिधी : मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात. परंतु न डगमगता या कर्माची फळे मी भोगतो, असा उद्वेग समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केला. माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांनी आयोजित केलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाविकांना उपदेश करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, डोक्यावरून नुसते काळेकुट्ट ढग वाहून जात असताना वीज किती कडाडली त्याला महत्व नाही. परंतु काळेकुट्ट ढगातून पाणी पडत असताना वीज कडाडत असेल तर सहन करायला काय हरकत आहे. आपणाला भविष्यात कुठं तरी सत्य पचवावं लागणार, मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्या मागे लागतात, दोन-तीन महिन्यांने असंही म्हणतील की इंदोरीकर महाराजांची नार्को चाचणी करा, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सोशल मिडीयावरील स्वत:च्या बदनामीच्या क्लिपबाबत खेद व्यक्त करत इंदोरीकर म्हणाले की, शेतकर्‍यांच्या व्यथा, वास्तव न दाखविता चुकीच्या पध्दतीने मांडल्या जातात. आपल्या परिसरातील सहकारी साखर कारखान्याने जर 2200 रुपये भाव जाहीर केल्यावर मिडीयाला दिवसभर पट्टी चालते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 3150 रुपये भाव जाहीर करूनही कुठेही पट्टी अथवा उहापोह होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, इंदोरीकर महाराज स्पष्टवक्ते असून समाजातील वास्तव समोर मांडतात. त्यांच्या बोलण्यावर काहींनी आक्षेप घेतले. मात्र आम्ही त्यांच्या विचाराबरोबर आहोत. इंदोरीकर महाराज शेतकर्‍यांच्या व्यथा मांडतात, असे रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच बाबू गेणू व शरद जोशी यांच्या 12 डिसेंबरच्या स्मृतीदिन कार्यक्रमास इंदोरीकरांना पाटील यांनी निमंत्रणही दिले.

COMMENTS