Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मणिपुर प्रकरणात भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आला-राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई प्रतिनिधी- मणिपुर मधील मागील अडीच ते तीन महिन्यापासून कुकी आणि मैतेई या दोन समुदायामध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान महिलांवर झा

डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
दरीत कोसळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे लाक्षणिक उपोषण

अंबाजोगाई प्रतिनिधी- मणिपुर मधील मागील अडीच ते तीन महिन्यापासून कुकी आणि मैतेई या दोन समुदायामध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हिडीओ सोशल व वृत्त माध्यमांवर  प्रसारित झाला. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे. हे दिसून आले. यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देवून मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, दि. 24 जुलै रोजी देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देण्यात आले आहे.
अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी नमुद केले आहे की, मणिपूर प्रकरणी खेद व निषेध प्रकट करून आपणांस नम्र विनंती आणि अतिशय दु:खद अंतःकरणाने आम्ही हे निवेदन करीत आहोत की, मणिपूर मध्ये मागील अडीच महिन्यांपासून कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान मागच्या बुधवारी मणिपूर मधल्या दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देवून मणिपूर मध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी. कारण, हा व्हिडिओ खरा असल्याची खात्री करून मणिपूर पोलिसांनी म्हटले आहे की, मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात 4 मे रोजी या दोन महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. मणिपूर पोलीस म्हणाले की, ही घटना 4 मे ची आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यापासून केंद्र सरकार विरोधात देशभर जनतेतून निषेध व आक्रोश व्यक्त केला जात आहे. कारण, या जातीय संघर्षामुळे भारतीय जनता पक्षाचा मुखवट्या आड लपवलेला खरा चेहरा जगासमोर आला आहे. मणिपूर राज्यातला हिंसाचार हा गुजरात मधल्या गोध्रा हत्याकांडा सारखाच हा सुनियोजित कटाचाच एक भाग आहे. याप्रकरणी राष्ट्रीय नेते राहुल गांधींनी या जातीय संघर्षात होरपळलेल्या पिडीत कुटुंब आणि नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण काळात अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व गांधी परिवार आपल्या सोबत असल्याचा विश्वास देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाळलेले मौन आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे मणिपूरला अराजकाकडे ढकलले जात आहे. मणिपूर मध्ये राष्ट्राच्या विचारांवरच अशा प्रकारे हल्ला केला जात असताना भारत शांत राहणार नाही. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत उभे आहोत आणि आता शांतता स्थापित करणे हाच एकमेव पर्याय आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूर मधली समाज माध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत. दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. तसेच माणुसकीला काळीमा फासणारी आहेत. या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्र सरकार कडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूर मध्ये गेल्या 3 महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचे भाजपाचे मोदी सरकार हेच जबाबदार असेल. मा.सर्वोच्च न्यायालयाने ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये महिलांवर होणारे हल्ले, अत्याचार यांनी कळस गाठलेला आहे. मणिपूर राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भीषण हिंसाचार होत आहे, विशेष करून यामध्ये महिलांना लक्ष्य केले जात आहे, हे दाखविणारे व्हिडीओ वृत्त माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर प्रगट झाले. अत्यंत खेदजनक व संतापजनक अशी ही घटना मे महिन्यामध्ये मणिपूर मध्ये घडली. महिलांना विवस्त्र करून अत्यंत लांच्छनास्पद पद्धतीने त्यांच्यासोबत व्यवहार करीत त्यांची धिंड काढली गेली आणि यात अनेक बघे पुरूष व तरूण होते. हा व्हिडिओ तीन महिन्यानंतर माध्यमांपर्यंत आला, याचा अर्थ या घटनेच्या आधी आणि नंतर ही मणिपूर येथे होत असलेल्या हिंसाचारामध्ये महिला क्रूर अत्याचारास बळी पडत आहेत. मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे आणि देशातील कोणत्याही स्त्रियांवर अशा पद्धतीने अत्याचार ह असतील तर केंद्र सरकारने तातडीने कार्यवाही करायला पाहिजे होती. पण, तसे होताना दिसत नाही. मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने सदरील निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमेटी निषेध व्यक्त करीत आहोत. महिलांवर हिंसाचार करणार्या व्यक्ती, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासन या सर्वांवर तातडीने कठोर कारवाई करावी, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देवून मणिपूर मध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी व विनंती सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, राहुल मोरे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, बाळासाहेब जगताप, संजय काळे, महादेव गव्हाणे, मुक्तार बागवान, शेख अकबर, ऋषीकेश सोमवंशी, विल्यम अन्नतुल्ला, राजेंद्र गायकवाड, बबलु औचित्ते, अविनाश घोडके, विष्णु पांचाळ, प्रविण सोमवंशी, भारत काटे, अभिजीत औचित्ते, अनवर कुरेशी, समद कुरेशी, नईम शेख, योगेश देशमुख, हनुमंत जाधव, शिवाजी गंगणे, के.व्ही.गायकवाड, नंदकुमार पवार, किशोर निकम आदींसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS