Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा

सोलापूर प्रतिनिधी :- उत्तर सोलापूर तालुक्यातील एका बारावीच्या विद्यार्थ्यांने सहामाही परीक्षा पेपर देताना,उत्तर पत्रिकेतून मराठा आरक्षणाची मागणी

कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय होणार सुरु ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
प्रा. कुंदा दाभोळकर स्मृति केंद्रातर्फे लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृहाला सहयोग निधी आज प्रदान कार्यक्रम
बाजार समितीच्या निवडणूकीत तीन दिग्गजांचे अर्ज नामंजूर

सोलापूर प्रतिनिधी :- उत्तर सोलापूर तालुक्यातील एका बारावीच्या विद्यार्थ्यांने सहामाही परीक्षा पेपर देताना,उत्तर पत्रिकेतून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पहिल्या पानावर ‘एक मराठा कोटी मराठा’ लिहून उत्तर लिहिण्यास सुरुवात केल्याचा प्रकार घडला आहे. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बीबीदारफळ संचलित श्री गणेश विद्यालय बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर येथील हायस्कूलमध्ये बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सहामाहीचा पेपर सोडविताना चक्क एक मराठा कोटी मराठा अशी लिहून सुरुवात केली. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे- पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील घराघरात पोहोचले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ शाळा- महाविद्यालयातही पाहायला मिळत आहे.एक मराठा कोटी मराठा लिहून पेपरला सुरुवात बीबी दारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे हा बारावीत शिक्षण घेत आहे.दिवाळी अगोदर शाळा व महाविलयाच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत.संकेत साखरे याचा 2 नोव्हेंबर रोजी राज्यशास्त्राचा पेपर होता. पेपर लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर संकेतने एक मराठा कोटी मराठा असे लिहून सुरुवात केली आहे. त्यासोबत जय जिजाऊ ,जय शिवराय,असेही मजकूर लिहिले आहे

COMMENTS