औंध / प्रतिनिधी : औंध येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वरिष्ठ अजिंक्यपद गादी गटात पृथ्वीराज पाटील याने बाजी मा

औंध / प्रतिनिधी : औंध येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वरिष्ठ अजिंक्यपद गादी गटात पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली आहे. महिला महाराष्ट्र केसरीसाठी हजारमाचीची गोल्डन गर्ल वेदातिका पवार महिला महाराष्ट्र केसरीसाठी प्रतिनिधित्व करणार आहे.
सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अंकुशभाऊ गोरे युवा मंचने जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन केले होते. यावेळी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी गादी आणि माती गट, महिला महाराष्ट्र केसरी, ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी झाली. सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष बापू लोखंडे सचिव धनाजी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ सदस्यपदी संदीप भोंडवे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी जिल्हाभर स्पर्धात्मक कुस्ती मैदान घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी तांत्रिक समिती प्रमुख प्रा अमोल साठे सर्व पंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले मल्ल पुढीलप्रमाणे :
महिला महाराष्ट्र केसरी : वजनगट अनुक्रमे : अनुष्का हस्पे, राज नंदिनी रणवरे, योगिता सरक, साक्षी मोरे, कशिश शेख, साक्षी पाटील, दिव्या पोळ, महिला महाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी : जयंत शेंडगे, करण किर्दत, यश जाधव, निखिल ठोंबरे, सौरभ काळे, निलेश जाधव, आशिष कुंभार कासार, रोहित खाडे, यज्ञेश शितोळे, महाराष्ट्र केसरी सिध्देश साळुंखे. वरिष्ठ अजिंक्यपद गादी विभाग (फ्रिस्टाईल) : साहिल गोफणे, आरू खांडेकर, सूरज गोफणे, ओंकार फडतरे, किरण राणे, आकाश माने, संदेश शिपुगले, प्रथमेश माने, श्रीधर गोडसे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, वरिष्ठ गट माती विभाग देवराज मोहिते, गोरख कोळेकर, विशाल रूपनवर, इंजमाम पटेल, तेजस गोफणे, राहुल कोरडे, विशाल कोकरे, अजिज सय्यद, मंगेश माने, महाराष्ट्र केसरी तुषार ठोंबरे.
महाराष्ट्र केसरीचे कुस्ती स्पर्धा घेणार
आमच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा आहे. माझे बंधू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पैलवान आहेत. माण खटावच्या मातीत अनेक होतकरू युवा मल्लांची खाण आहे. निवड चाचणीच्या माध्यमातून अनेकांना मराठमोळ्या रांगड्या खेळाचा आनंद घेता आला याचा मनस्वी आनंद आहे. राज्यातील अव्वल दर्जाच्या पैलवानांचा खेळ कुस्ती शौकीनांना पाहता यावा यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करणार असल्याचे अंकुश गोरे यांनी सांगितले.

COMMENTS