अहमदनगर/प्रतिनिधी : भिंगारमध्ये शुक्रवार बाजार येथे टपर्यांना आग लावण्यात आली. त्यामुळे काही काळ भिंगारमध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.
अहमदनगर/प्रतिनिधी : भिंगारमध्ये शुक्रवार बाजार येथे टपर्यांना आग लावण्यात आली. त्यामुळे काही काळ भिंगारमध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. हीी घटना मंगळवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपींवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान या संदर्भामध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अतुल गुलदगड यांनी फिर्याद नोंदवली. यामध्ये प्रमोद फुलारी उर्फ शक्ती (रा. माळीगल्ली), रोकडे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरामध्ये काहीजणांच्या शेकोटीच्या ठिकाणी गप्पा सुरु होत्या. एकमेकांची उणीदुणी सुरू होती. त्यातच एकाने त्याठिकाणी असणार्या टपरीला आग लावली. त्यानंतर काही वेळाने या दोन आरोपींनीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा फ्लेक्स बोर्ड देखील खालच्या बाजूने फाडला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS