Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूमध्ये भाजपची मित्रपक्षाने सोडली साथ

चेन्नई/वृत्तसंस्था ः तामिळनाडूमध्ये मित्रपक्षाची सोबत घेऊन, आपली ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपचे मनसुबे मात्र मित्रपक्षाने उधळल

ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून जादूटोणा व भानामती प्रकारात वाढ
लालपरी जागी खासगी गाड्या फलाटावर; सांगली जिल्ह्यातील प्रकाराने महामंडळाचे वाभाडे
मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही

चेन्नई/वृत्तसंस्था ः तामिळनाडूमध्ये मित्रपक्षाची सोबत घेऊन, आपली ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपचे मनसुबे मात्र मित्रपक्षाने उधळले आहे. ज्याच्या साथीने दक्षिणेत पाय पसरण्याची तयारी भाजपने चालवली होती. त्या मित्रपक्षाने भाजपची साथ सोडली आहे.

 तामिळनाडूमध्ये 27 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र यापूर्वीच भाजप व अन्नाद्रुमुक (ई. पलानीस्वामी गट) यांच्यात मतभेद उफाळून आले आहे. इरोड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएस गटाने भाजपापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ई.पलानीस्वामी गटाने पक्षाच्या कार्यालयातील पोस्टरमधूनही भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. पोस्टरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही काढून टाकला आहे. इतकेच नव्हे तर एआयएडीएमके (ईपीसएस गट) ने आपल्या आघाडी नाव राष्ट्रीय लोकशाही आघाडी बदलून राष्ट्रीय लोकशाही प्रगतीशील आघाडी असे केले आहे.

COMMENTS