Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर मध्ये शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करनाऱ्या मुलींना पाच हजारांचे बक्षिस व बरंच काही

सरपंचाने लढवली शक्कल

अहमदनगर प्रतिनिधी - सध्या अनेक मुलं गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र मुली मिळत नाही आहेत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आन

राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)
देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे
चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून;

अहमदनगर प्रतिनिधी – सध्या अनेक मुलं गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र मुली मिळत नाही आहेत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंदा रावसाहेब दुरगुडे  यांनी यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे.

शेतकरी वर्गातील मुले ही भरपुर काबड कष्ट करतात. मात्र या मुलांना कोणीही मुली देत नाही अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी व समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा. हा चांगला दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिनी योजना आपल्या गावात कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केले तर दरेवाडी गावचे सरपंचच हे वैयक्तिक खर्चातून त्यांना पाच हजार रुपये व संसार रुपी साहित्य देणार आहेत. या योजननेला त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना असे नाव देत ही योजना कारण्यात आली आहे. 

COMMENTS