Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोप बेनेडिक्ट १६ यांच्या स्मृतीत !  

पोप बेनेडिक्ट १६ यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी निधन झाले. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या इतिहासात पोप बेनेडिक्ट १६ हे एकमेव पोप

दैनिक ‘लोकमंथन’मुळे सत्ताधारी – विरोधक मागासवर्गीयांसाठी एकाच भूमिकेवर ! 
ओबीसींवर अन्याय कराल, तर, परिणाम भोगाल ! 
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !

पोप बेनेडिक्ट १६ यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी निधन झाले. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या इतिहासात पोप बेनेडिक्ट १६ हे एकमेव पोप होते ज्यांनी काही वर्षांनंतर पोप या सर्वोच्च धर्मगुरू पदाचा राजीनामा दिला होता. एप्रिल २००५ ते फेब्रुवारी २०१३ अशी आठ वर्षे त्यांनी या पदावर राहिल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. परंतु, पोप बेनेडिक्ट १६ यांचे संपूर्ण आयुष्य चढ‌उतारांचे आणि वादग्रस्त राहीलेले आहे. मुळात ते पोप बनले त्यावेळी त्यांनी वयाची अठ्ठ्यात्तरी गाठली होती. एवढ्या ज्येष्ठ वयात पोप झालेलेही ते प्रथमच होते. 

      पोप बेनेडिक्ट १६ यांचे मुळ नाव जोसेफ रात्झिंगर. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे १९२९ ला त्यांचा जन्म जर्मनीतच झाला होता. त्याकाळात जर्मनीत हिटलर चा नाझीवाद चांगलाच जोर धरून होता. त्यावेळी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेल्या कुमार वयीन मुलांना नाझींच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणे सक्तीचे होते. रात्झिंगर कुटूंब नाझी विरोधी असल्याकारणाने त्या कुटुंबातील पोप यांचे बंधू यांनी १४ व्या वर्षी नाझी प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याने त्यांना मृत्यू च्या शिक्षेला सामोरे जावे लागले होते. जोसेफ रात्झिंगर यांनी या प्रशिक्षणात जाण्यास नकार दिला होता. या त्यांच्या धिरोदात्तपणाचा नाझी पराभूत झाल्यानंतर च्या काळात त्यांना संपूर्ण जर्मनीत लोकप्रियता मिळाली. नाझींनी जिवंत माणसांचे केलेले हाल जोसेफ रात्झिंगर यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यानंतर त्यांचा मानसिक ओढा अध्यात्मिकतेकडे अधिकाधिक वाढत गेला. थिओलाॅजी या विषयात त्यांनी प्रचंड विद्वत्ता मिळवली. त्यांच्या विद्वतेमुळे जर्मनीतील अनेक विद्यापीठांनी त्यांना प्राध्यापक म्हणून पाचारण केले. 

   दुसऱ्या बाजूला रोमन कॅथोलिक धर्मगुरू म्हणून वेगवेगळ्या पदांवर त्यांच्या नियुक्त्याही सुरू होत्या. सतत वाचन, चिंतन आणि लेखन हा त्यांचा व्यासंग राहिला. अनेक ग्रंथांचे लेखनही त्यांनी केले, किंबहुना पोप यांच्या साखळीतील सर्वाधिक ग्रंथ लेखन करणारे पोप म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. विद्वत्ता वाढीस लागल्यावर बहुश्रुत व्यक्तिमत्व एका बाजूला जशी व्यापक होत जातात तसे दुसऱ्या बाजूला त्यांचे विचार कर्मठताही व्यक्त करू लागतात. कारण दीर्घकालीन चिंतन त्यांना एका बिंदूवर ठाम व्हायला लावते. नेमका हाच भाग अशा व्यक्तिमत्वांच्या व्यक्तित्वाला उणेपणाही आणतो. जोसेफ रात्झिंगर हे धर्मगुरू झाल्यानंतर सर्वोच्च पोप पदाला पोहचल्यावर त्यांचे विचार सेक्युलॅरिझम वर टिकात्मक भाष्य करू लागले होते. ज्या युरोपला आज जगातील विकसित देशांचा दर्जा मिळाला तो त्यांच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच. धर्म आणि राजसत्ता यांचा संघर्ष युरोपमध्ये उभा राहिला तेव्हा धर्मश्रद्धा असूनही लोकांनी विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरत राज्यसत्तेच्या मागे उभे राहणे ठामपणे केले. युरोपचा हा प्रबोधन चळवळीचा काळ ज्यांनी चांगला अभ्यासला ते सर्व सेक्युलर विचारांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे पोप बेनेडिक्ट १६ यांच्या राजीनाम्यामागे हेदेखील एक प्रभावी कारण होते. मात्र, हेदेखील तेवढेच खरे आहे की, पोप या सर्वोच्च धर्मगुरू कडून इतिहासातील अनेक चुकांचा माफिनामा देखील पोप बेनेडिक्ट १६ यांच्याच काळात सादर करण्यात आला. दुसऱ्या महायुध्दात अनेक जीव गेले.

परंतु, त्याकाळात जगातील कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंनी राज्यकर्त्यांना जीव हिंसा टाळण्याचे आवाहन केले नव्हते. त्यास ख्रिश्चन धर्म देखील अपवाद नव्हता. परंतु, त्या ऐतिहासिक घटनेबद्दल पोप बेनेडिक्ट १६ यांनी जाहीर माफीयाचना केली होती. पोप बेनेडिक्ट १६ हे सर्वच धर्मांच्या विषयी मत व्यक्त करणारे धर्मगुरू होते. अमेरिकेसह युरोपातील जवळपास सर्वच देशांमध्ये बौध्द विहारे उभी राहिल्याने त्यांनी ख्रिसमस या दोन्ही धर्माच्या धर्मगुरूंनी संयुक्तपणे साजरा करावा असे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचे धर्मगुरू दलाई लामा यांची २००७ मध्ये जाहीर भेट घेण्याचे ठरविताच चीन ने जाहीरपणे या भेटीवर आक्षेप घेतला होता. अशा विविध चढ‌उतारांचे अनुभव शिदोरी असणारे निवृत्त पोप बेनेडिक्ट १६ यांच्या निधनामुळे जग एक बहुआयामी धर्मगुरूला मुकले आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

COMMENTS