जामखेड ः आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून जीवे घेणे हल्ले होतांना दिसत आहेत. जामखेडमध्ये जून्या भांडणाचा राग मनात धरून मोटारसायकल अडवुन एक जणास का
जामखेड ः आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून जीवे घेणे हल्ले होतांना दिसत आहेत. जामखेडमध्ये जून्या भांडणाचा राग मनात धरून मोटारसायकल अडवुन एक जणास काठी, कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी करत जीवे घेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदर घटना जामखेड शहरातील आरोळे वस्तीवर 10 जून रोजी रात्री 9 वाजे सुमारास घडली आहे.
फिर्यादी-अशोक रतन म्हस्के वय 23 वर्षे राहणार कोल्हेवस्ती, जामखेड यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रमोद प्रवीण घायताडक, सलमान आतार, रोहित शिवाजी गायकवाड, चांदनूर उर्फ आयन शेख या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना तातडीने ताब्यात घेतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोहेकाँ प्रविण इंगळे, पोना जितेंद्र सरोदे, संतोष कोपनर पोकाँ मंडगे, पोकाँ कुलदिप घोळवे, पोकाँ देवा पळसे या पोलीस पथकाने तात्काळ शोधकार्य करत मोठ्या शिताफीने रात्रीतून काही तासांत सर्व आरोपींना अटक केलेली आहे. फिर्यादी आशोक रतन म्हस्के जखमी असून जामखेड येथील समर्थ हाँस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. मागील जून्या भांडणाच्या रागातुन ही मारहाण केल्याचे पोलिस चौकशीत आरोपींनी सांगितले मात्र भांडणाचे निश्चित कारणांचा पोलिस कसुन शोध घेत आहे. पुढील तपास सपोनी वर्षा जाधव करत आहेत.
COMMENTS