Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ महिन्यात सायबरचे 1114 गुन्हे दाखल , पुणेकरांना 20 कोटींचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता सायबर क्राईमचे माहेरघर होतांना दिसून येत आहे. सध्या सर्व व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन

हेमा मालिनी यांनी गदर 2 चे केले कौतुक
 जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा – माजी मंत्री डी पी सावंत 
चालत्या बाईकवर तरुणाला विषारी साप चावला

पुणे/प्रतिनिधी ः विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता सायबर क्राईमचे माहेरघर होतांना दिसून येत आहे. सध्या सर्व व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूकीचे सर्वात जास्त प्रकार समोर आले असून विविध प्रकरणात आठ महिन्यात तब्बल 20 कोटींची फसवणूक झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याने गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा सायबर क्राईमकडे वळवला असून कधी नोकरीचे आमिष, तर कधी ऑनलाईन पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सर्वात जास्त सायबर गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 फसवणूकींच्या गुन्ह्यांचे अर्ज आले असून यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. यामध्ये मनी ट्रान्स्फरचे 56 गुन्हे, केव्हाएसी अपडेटचे 42 गुन्हे, क्रीपटोकरन्सीचे 58, इंशोरंसबाबत फसवणुकीचे 10, जॉब फसवणुकीचे 31, शेअर मार्केट फ्रॉडचे 27, लोन फ्रॉडचे29, ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉडचे 62, फेक प्रोफाईलचे 85, फेसबुक हॅकिंगचे 34 आणि सेक्सटॉर्षणचे 35 अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्याचे आणि त्याबाबतीत जनजागृती करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

COMMENTS