Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधी सेवा समिती सातारा अंतर्गत दिवड शिबिर संपन्न

गोंदवले / वार्ताहर : विधी सेवा समिती सातारा अंतर्गत विधी सेवा समिती दहिवडी व म्हसवड यांचे सौजन्याने दिवड, ता. माण येथील इंदिरा गांधी ज्युनिअर क

हे राजकीय व्यासपीठ नव्हे : अभिजीत पाटील यांचा इशारा
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे

गोंदवले / वार्ताहर : विधी सेवा समिती सातारा अंतर्गत विधी सेवा समिती दहिवडी व म्हसवड यांचे सौजन्याने दिवड, ता. माण येथील इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. राजेंद्र भागवत यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक कारंडे यु. जी. यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य गोरे होते.
या शिबिरात अ‍ॅड. राजेंद्र भागवत यांनी संविधानाने दिलेली नागरिकांनी पाळावयची कर्तव्य याविषयी सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड. सारिका कापसे यांनी सायबर क्राईम या विषयावर विस्तृत माहिती दिली. अ‍ॅड. माया जानकर यांनी सामोपचाराने कोर्टाच्या बाहेर वाद मिटविणे या सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड. स्वाती कवितके-ढालपे यांनी बाल संरक्षण कायदा याविषयी विविध उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिली. शेवटी आभार प्राध्यापक कारंडे जे. यु. यानी मानले. शिबिराला दिवड पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ व ज्युनिअर कॉलेजचे व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS