पुणे : लोकसभेची रणधुमाळी सुरू असतांना आणि मंगळवारी बारामती मतदारसंघात मतदान झाल्यानंतर गोळीबार करण्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. वारजे माळ
पुणे : लोकसभेची रणधुमाळी सुरू असतांना आणि मंगळवारी बारामती मतदारसंघात मतदान झाल्यानंतर गोळीबार करण्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुण्य बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. वारजे माळवाडी हा भाग बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला मतदार संघात येतो. या ठिकाणी मतदान झाल्यावर रात्री 11 च्या सुमारास येथील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. वारजे येथे मतदान शांततेत पार पडल्यानंतर रामनगर परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रामनगर भागातील शक्ती चौकात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले. मात्र, हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अद्याप पुढे आली नाही. पोलिस याचा तपास करत आहेत. आरोपी हे एका दुचाकीवरून आले होते. हवेत पिस्तुलातून गोळीबार केल्यावर आरोपी हे फरार झाले. गोळीबार करणारे आरोपी हे मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन कात्रजकडे फरार झाले. या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गोळीबार झालेल्या चौकातील सिसिटीव्ही तपासण्यात येत असून आरोपींना लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी दिली.दरम्यान पुण्यात खून, दरोडे, चोर्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर गोळीबार करण्याची घटना उजेडात आल्यानंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
COMMENTS