सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही : भरत गोगावले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही : भरत गोगावले

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात असून, त्याच्या निकालाची प्रतीक्षा शिवसेनेसह भाजप आणि शिंदे गटाला देखील आहे. राज्यात

ऑनलाईन गेमने भावाला बनवले खुनी | LokNews24
चंद्रदर्शन झाल्याने आजपासून रमजान उपवासांना प्रारंभ
Solapur : मंद्रूप ग्रामसेवकांचा गलथान कारभार (Video)

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात असून, त्याच्या निकालाची प्रतीक्षा शिवसेनेसह भाजप आणि शिंदे गटाला देखील आहे. राज्यातला सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्ष दीर्घकाळ चालेल असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात येत आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल किमान 5 वर्षे लागण्याची शक्यता नाही असे खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आहे.
कर्जत येथे शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाकडून आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत. भरत गोगावले हे रायगडमधील महाड येथील आमदार आहेत. शिंदे गटाने कर्जत येथे रविवारी आपला पहिला मेळावा घेतला. या मेळाव्यात भरत गोगावले यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण पाच वर्ष चालणार आहे. येत्या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आम्ही रोखले आहे. भाजप आणि शिवसेनेचे मिशन 200 पूर्ण करायचे आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून चमत्कार घडवणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले. आम्ही गद्दार होऊ शकत नाही असेही भरत गोगावले यांनी म्हटले. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहोत, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आमच्याकडे राहणार असून आम्हीच पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. आमचा नाद करायचा नाही असं म्हणत गोगावले यांनी विरोधकांना इशारा दिला. यावेळी गोगावले यांनी शिवसेनेचे नेते माजी खासदार अनंत गीते, सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. अनंत गीते यांनी आपला स्वार्थ साधला असल्याचा आरोप गोगावले यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी घटनापीठासमोर करण्याचे आदेश सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठाने दिले होते.सरन्यायाधीश रमण्णा यांच्या निवृत्तीच्या काही दिवस आधी ही सुनावणी झाली होती. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का? या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल? राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका आदी मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निर्देशानंतर पाच सदस्यीय खंडपीठ स्थापन होणार आहे.

सुनावणी लांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही : मंत्री केसरकर
आमदार भरत गोगावले यांच्या विधानानंतर स्पष्टीकरण देतांना, शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. सुनावणीबाबत गोगावलेंनी तसे वक्तव्य करणे चुकीचे आहे. यापुढे सुनावणीबाबत कोणतेही वक्तव्य न करण्याच्या सूचना भरत गोगावलेंसह शिंदे गटातील सर्वच आमदार व पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. केसरकर म्हणाले, गोगावलेंचे वक्तव्य शिंदे गटाची भूमिका नाही किंवा सुनावणीदरम्यान वेळ काढण्याचाही आमचा कोणताही हेतू नाही. तसेच, न्यायालयात सुनावणीदर व निकालाला विलंब होतो, असेही आमचे काही म्हणणे नाही. सुनावणी ही न्यायालयाच्या नियमानुसारच चालेल. तो न्यायालयाचा सर्वाधिकार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार व पदाधिकारी यापुढे काहीही बोलणार नाहीत, याची काळजी घेऊ.

COMMENTS