नाशिक प्रतिनिधी - शुक्रवार रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने सन 2022- 23 मध्ये विकसित केलेले पूर्व माध्यमिक (5 वी) शिष्यवृत्ती परीक्षा
नाशिक प्रतिनिधी – शुक्रवार रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने सन 2022- 23 मध्ये विकसित केलेले पूर्व माध्यमिक (5 वी) शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी विषय साहित्य व सराव पुस्तिका आणि मराठी विषयाचे मराठी बोली भाषा शब्दकोश पुस्तिका यांचे प्रकाशन जिल्हा परिषद नाशिक येथे मा. श्रीम. आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक आणि श्री. अनिल गौतम, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी विषयाबाबत साहित्य व सोपे,मध्यम व कठीण स्वरूपाच्या प्रश्नांना कशाप्रकारे सामोरे जायचे. इंग्रजी विषयाचे दडपण कमी होवून सहजगत्या अधिक सराव साहित्य मिळावे. यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक यांना शिष्यवृत्ती परीक्षा निकाल व गुणवत्ता वाढ होण्यासाठी मदत होईल.
तसेच प्रसंगी आदिवासी तालुक्यातील बोली भाषेची माहिती होवून शिक्षणातील अडचणी दूर व्हाव्यात..यासाठी मराठी बोली भाषा शब्दकोश पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. प्रसंगी सदर इंग्रजी विषय सराव साहित्य पुस्तकाचे संपादक तथा इंग्रजी विभाग प्रमुख श्री. कैलास सदगीर , ज्येष्ठ अधिव्याख्याता,श्रीम. रंजना लोहकरे ,डॉ. सुनील बाविस्कर श्रीम. रेवती ठाकूर अधिव्याख्याता, श्री प्रमोद गाडे,श्री प्रविण पवार विषयतज्ञ तसेच सदर इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी विषय सराव साहित्य पुस्तक निर्मिती सदस्य शिक्षक श्री. जयेशकुमार कापडणीस , श्री. प्रेमानंद घरटे , श्री. प्रदीप खैरनार , प्रा. श्री. गोकुळदास मोरे,रतन चौधरी, सहादू चौधरी, तुकाराम चौधरी,भगवंत भोये, मंगलदास गवळी आदी उपस्थित होते.
COMMENTS