Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक – डॉ अभिमन्यू ढोरमारे

पाथर्डी प्रतिनिधी - स्वामी विवेकानंद हे महान समाजसुधारक,तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते.त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात

धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा
पाथर्डी शहरात पाळला कडकडीत बंद
अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त

पाथर्डी प्रतिनिधी – स्वामी विवेकानंद हे महान समाजसुधारक,तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते.त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.हा दिवस देशातील तरुणांना समर्पित आहे ज्यांच्याकडे भारतासाठी निरोगी आणि चांगले भविष्य घडवण्याची क्षमता आहे.स्वामी विवेकानंदांचे तरुणांशी घट्ट नाते होते,स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व भारतातील तरुणांमध्ये रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ अभिमन्यू ढोरमारे यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आयोजित स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयावर बोलत होते. 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ जी. पी. ढाकणे, मराठी विभागप्रमुख डॉ सुभाष शेकडे, डॉ बबन चौरे, पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे, डॉ अशोक कानडे, प्रा दत्तप्रसाद पालवे, डॉ अजयकुमार पालवे, डॉ अशोक डोळस, प्रा सचिन पालवे आदी उपस्थित होते. 

यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी कृष्णा चव्हाण, सुरज डमाळे, समर्थ हिंगे, गौरी औटी, समर्थ जोशी, सार्थक तुपे, प्रतीक्षा पवार, आनंद भोसले, सिद्धी राठोड या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी विचार मांडले.प्राचार्य डॉ जी पी ढाकणे व प्रा सचिन पालवे यांनी मार्गदर्शन केले. इतिहास अभ्यास मंडळावर डॉ अशोक कानडे निवडून आल्याबद्दल त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुभाष शेकडे, सुत्रसंचालन कु. वैष्णवी जसाभाटी तर आभार कु स्वाती दहिफळे यांनी मानले.

COMMENTS