हदगाव प्रतिनिधी - हदगाव तालुक्यातील नागरिकांना शासनाचे धान्य मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत,अनेक नागरिकाकडे राशन कार्ड नसल्यामुळे, किंवा ऑनलाईन ड
हदगाव प्रतिनिधी – हदगाव तालुक्यातील नागरिकांना शासनाचे धान्य मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत,अनेक नागरिकाकडे राशन कार्ड नसल्यामुळे, किंवा ऑनलाईन डाटा फीड न झाल्यामुळे दरमहा शासनाकडून मिळणार्या राशनच्यां धान्यापासून वंचित रहावे लागत आहे,हदगाव तालुक्यातील नागरिकांच्या या सर्व समस्या सोडवून त्यांना त्वरित राशन कार्ड वाटप करावे, लाभार्थ्यांचा लक्षांक वाढवून घ्यावा,लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवू नये अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पुरवठा अधिकारी,नांदेड यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
हदगाव तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना शासनाचे राशन मिळत नाही,शेतकर्यांना देखील धाण्याचा लाभ मिळत नाही, तालुक्यातील हजारो नागरिकांचे नाव ऑनलाईन डाटामध्ये फिड होत नसल्यामुळे शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे, यासाठी हदगाव तालुक्यातील लाभार्थ्यांचा योजनेमध्ये लक्षांक वाढवून द्यावा, वाढीव लक्षांक मिळाल्यानंतर हदगाव तहसीलच्या पुरवठा विभागाने सर्व नागरिकांचे ऑनलाईन डाटा फीडिंग करून नागरिकांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, नागरिकांच्या समस्या,गैरसोय जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कानावर घालून त्या तात्काळ सोडवण्यासाठी आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
COMMENTS