Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलितांवर हल्ला करणार्‍यांना त्वरित अटक करा

अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्याचा सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचा इशारा

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कणगर येथिल दलित महिलांसह दोन पुरुषांवर धारदार शस्त्राने हल्ल्याच्या घटनेचा निषेध करुन पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 
पूजा खेडकरला तूर्त कठोर कारवाई नको : सर्वोच्च न्यायालय
संगमनेर बस स्थानक विकासकाला साडे तीन कोटींचा दंड

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कणगर येथिल दलित महिलांसह दोन पुरुषांवर धारदार शस्त्राने हल्ल्याच्या घटनेचा निषेध करुन पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली असती तर दलित महिलांवर हल्ला झाला नसता. या हल्ल्यास पोलिसही तितकेच जबाबदार आहेत. हा हल्ला करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा सत्यशोधक लहुजी क्रांती सेना रस्त्यावर उतरुन जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व तहसीलदार यांना निवेदन दिल्या नंतर दिला आहे.
           सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली कणगर येथिल दलित महिलांसह पुरुषांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून संत गाडगेबाबा आश्रम शाळेत पासून  मोर्चा काढुन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसिलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. राहुरी तालुक्यातील दलित समाजातील महिला व पुरुषांवर संपत ऊर्फ विकास हरीभाऊ गोसावी, गणपत हरीभाऊ गोसावी, अशोक ऊर्फ ढवळ्या रघुनाथ माळी, (सर्व रा. कणगर), तसेच गोविंद ऊर्फ गोयंद्या, सुदाम ऊर्फ सुद्या, व नादर्‍या, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. या सहाजणांनी  शेतीच्या वादातुन धारदार शस्त्राने हल्ला करण्यात केला.हल्ल्यापुर्वी एक दिवस अगोदर राहुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा ट्रॉसिटी क्टनुसार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल असलेल्या गुन्ह्यात संपत ऊर्फ विकास हरीभाऊ गोसावी, गणपत हरीभाऊ गोसावी यांना त्याचवेळी अटक केली असती तर गोसावीसह त्याचे साथीदार दलित कुटुंबावर हल्ला करुच शकलेच नसते.दलित कुटुंबाने गोसावी विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून गोसावीसह त्याच्या साथिदारांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.या हल्ल्यात चार महिलांसह दोन पुरुष गंभिर जखमी झाले आहे. गुन्हा दाखल होवून या घटनेला पाच ते सहा दिवस झाले आहे. तरी या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिस प्रशासनाने आरोपी लवकरात लवकर अटक करावी. पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्यात गोसावी यास अटक केली असती तर हा हल्ला झाला नसता. या हल्ल्यास पोलिसही तितकेच जबाबदार आहेत. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली नाही.तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, राज्य प्रवक्ते निलेश जगधने, राज्ज्याचे  महासचिव सतीश बोरुडे, जिल्हा अध्यक्ष नंदूभाऊ शिंदे, राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, राहुरी तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने राहुरी तालुका संघटक संदीप जगधने, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगधने, राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे, नगर तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव सचिन नन्नवरे, बाबाजी जगधने, विलास बोरुडे, शरद लोखंडे, नितीन मोरे, बहुजन युथ पँथर राहुरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत जगधने, सुनील जगधने, आकाश बोरूडे, विलास जगधने, सामाजिक कार्यकर्ते आशाताई दिनकर, बाबुराव चव्हाण, निलेश पवार, गणेश जगधने, संकेत थोरात, सागर चांदणे, प्रल्हाद ससाने. कल्याण जगधने, वैभव जगधने, लक्ष्मण गायकवाड, पप्पू तोरणे, प्रकाश लाहुंडे, शरद लोखंडे, आदी उपस्थित होते.

COMMENTS