कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी पढेगाव या परिसरात मागील आठवड्यात वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून यात नु

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी पढेगाव या परिसरात मागील आठवड्यात वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून यात नुकसान झालेल्या बाधितांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करंजीचे उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती बघता तसेच रेशनिंग, चारा टंचाई, पाणीटंचाई, विजेच्या समस्या आदी महत्त्वाच्या समस्यावर उपाययोजनाकरणे संबधी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख नितीन औताडे, कोपरगाव तालुका प्रमुख रावसाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे आदी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांची भेट घेतली असता याप्रसंगी जाधव यांनी ही मागणी प्रशासनाकडे केली. याप्रसंगी जाधव यांनी प्रशासनाकडे मागणी केली की मागील आठवड्यात गुरुवार दि 16 मे रोजी करंजी पढेगाव परिसरात झालेल्या वादळाने अनेक कुटुंबाचे वेगवेगळ्या संसार उपयोगी साहित्याचे तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांचा प्रशासनाने पंचनामा देखील आहे. त्यामुळे सदर नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करंजीचे उपसरपंच तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे याप्रसंगी तहसीलदार संदीप कुमार भोसले, प्रभारी गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.काटे, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदी सह तालुक्यातील वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते
COMMENTS