Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासे तालुक्यातील अवैध दारुविक्री जोमात

माका/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यात अनेकवेळेस बहुतांश ठिकाणी टाकलेल्या छाप्यात बनावट दारुसंबधीचा प्रकार संबधित विभागीयांकडुन उघडकीस आल्याने, या पा

अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे आहेत ः डॉ. बाबुराव उपाध्ये
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 
विवेक कोल्हे यांचा नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष अर्ज

माका/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यात अनेकवेळेस बहुतांश ठिकाणी टाकलेल्या छाप्यात बनावट दारुसंबधीचा प्रकार संबधित विभागीयांकडुन उघडकीस आल्याने, या पाठोपाठ अलीकडे नेवासे तालुक्यातही, अवैधरीत्या रासायनीक साहित्यांच्या सहाय्याने नकली दारुचा मोठ्या प्रमाणात साठा तयार करून, तालुक्यात तसेच बाहेर इतरत्र विक्री केली जात असल्याचे व यामुळे निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागल्याबाबत, तसेच दारुबंदी कार्यालयाकडे तक्रारीसाठी गेले असता कधीतरी चालू बंद दिसुन येत असून, कार्यालयीन अधिकारी व नजीकच्या पोलिस ठाण्याकडून निष्क्रीय दृष्टीकोनाचा मार्ग अवलंबला जात असून, दारु तयार करणारे व अवैध व्यावसायीक तुम्हींच दाखवुन द्या, असे उत्तर मिळत असल्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा सध्यातरी तालुक्यात ठिकठिकाणी होते असल्याने, तसेच भविष्यात बेकायदा दारु विक्रेते व्यावसायीक व बनावट दारु निर्माते व विक्रेत्यांमुळे दारुकाडांबाबतीत होणार्‍या जीवितहानी परिणामास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत असे की याअगोदर नगर तालुक्यातील नेवासे नजीकच्या खोसपुरी पांगरमल गावात मोठ्या संख्येने नि ष्पाप नागरिकांना जिल्हा रुग्णालयाजवळचे तयार होत असलेल्या बनावटीदारुमुळे प्राण गमवावे लागले होते. या मुळे संपुर्ण जिल्हा हादरुन गेला होता.हिच पुनरावृत्ती तर नेवासे तालुक्यात होणार नाही ना? याबाबत साशंकता सर्वत्र व्यक्त केली जात असून, कधीतरी एखाद्यावेळी उघडे असलेले दारुबंदी कार्यालयाकडुन तसेच नजीकच्या पोलीस ठाण्याकडुन अवैध व्यावसायाबाबतीत तक्रारी नेणारयासं तुम्हीच शोधुन द्या, व सांगा नंंतर आम्ही पकडु न कारवाई करुु असेही उत्तर मिळत असल्याचे समजते. यासंबंधी बहुतांश गावाच्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेच्या माध्यमातून, निवेदनांच्या स्वरुपात असली नकली अवैध दारुसंबधी बंद करण्याबाबतीत, हद्दीतील, तालुकाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांंना माहिती वेेळो वेळी दिली असतानाही, उपाययोजना होत नसल्यामुुळे या जीवघेण्या प्रसंगाला बळी मात्र सर्वसामान्य निष्पापांना जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.        

COMMENTS