दुसरीही मुलगी नको म्हणून विवाहितेचा बळजबरीने गर्भपात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसरीही मुलगी नको म्हणून विवाहितेचा बळजबरीने गर्भपात.

परळीत पुन्हा अवैध गर्भपात गर्भलिंगनिदान पती सासूसह चौघांवर गुन्हा दाखल.

बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) च्या परळी(Parli) तील स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण देशभरात गाजलं होतं. आता पुन्हा  दुसरी मुलगी नको म

कोरोनासह स्वाईन फ्लूचीही होणार तपासणी
Breking : पेट्रोल २ रुपये ८० पैसे, डिझेल १ रुपये ४४ पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) च्या परळी(Parli) तील स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण देशभरात गाजलं होतं. आता पुन्हा  दुसरी मुलगी नको म्हणून एका विवाहितेचा बळजबरीने गर्भपात(Abortion) केल्याची घटना परळीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्या तिघांसह डॉक्टरवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला पहिली मुलगी असून आता दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र दुसरी मुलगी नको म्हणून एका डॉक्टरला हाताशी धरुन बेकायदेशीर गर्भलिंगनिदान(Pregnancy diagnosis) केले. त्यानंतर गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांच्या सांगण्यावरुन त्या महिलेचा बळजबरीने गर्भपात केला. या गर्भपातास पीडित महिलेने विरोध केला. मात्र तिचे कुणीही ऐकले नाही. अखेर या महिलेने परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात(Sambhajinagar Police Station in Parli) धाव घेत फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती, सासू, संबंधित डॉक्टर आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल केला.

COMMENTS