Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल

मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा एकदा इशारा

लातूर ः मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली असून, ते राज्यातील विविध जिल्ह्यात सभा घेत  करतांना दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
सरकारला पुढील आंदोलन पेलणार नाही

लातूर ः मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली असून, ते राज्यातील विविध जिल्ह्यात सभा घेत  करतांना दिसून येत आहे. लातूरमध्ये रविवारी घेतलेल्या सभेत त्यांनी सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, मात्र जर समाजाशी काही दगाफटका केल्यास सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले, मनोज  पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेले आंदोलन 80 टक्के यशस्वी झाले असून 35 लाख कुणबी नोंदीवरून पावणेदोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहेच, येत्या 24 डिसेंबरला ऐतिहासिक कायदा होईल, असा विश्‍वास मनोज जरांगे-पाटील यांनी निलंगा येथील जाहीर सभेत काल (शनिवारी) व्यक्त केला. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समाजाशी दगाफटका  वेळ मारली तर पुढची वेळ तुम्हाला जड जाईल, आरक्षण मिळावे म्हणून सर्व समाज पाठीशी आहे.एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते बघतोच असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठ्यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्‍वास आहे. जे अधिकारी जाणूनबुजून नोंदी सापडू देत नसतील ते कामापासून दूर होणार आहेत. कितीही ढोल वाजवत  तरी आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. चौकाचौकात 50 हजार लोक जमत आहेत. जरा विचार करा, हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे. फडणवीसांनी आताच शहाणे व्हावे नाही तर मी सगळे बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावे. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असे  जरांगे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. या दोन दिवसांत ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी बैठका घेणार आहेत. दुपारी औसा तालुक्यातील किल्लारी येथे सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर जरांगे पाटील धाराशिव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असणार आहे. 11  रोजी पुन्हा लातूर जिल्ह्यात मुरुड येथे त्यांची महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांसह, भुजबळांवर जहरी टीका – फडणवीसांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला सांगितले आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसे बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असे देखील जरांगे म्हणाले. छगन भुजबळांनी केलेल्या टीकेवर  जरांगे यांनी उत्तर दिले आहे. कामातून गेलेला माणूस असून लवकरच गोळ्या सुरु कराव्यात. शहाणा माणूस असता, तर उत्तर दिले असते, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

COMMENTS