Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार

मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पुणे ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे महाराष्ट्रभर सभा घेतांना दिसून येत आहे. पुण्यातील खराडी येथील सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता सरकारला आता

सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा
कुणबी नको, स्वतंत्र आरक्षण द्या
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

पुणे ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे महाराष्ट्रभर सभा घेतांना दिसून येत आहे. पुण्यातील खराडी येथील सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता सरकारला आता लेखी नाही तर थेट शेवटचंच विचारणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता समाजातील प्रत्येक आमदाराने पाठीशी उभे राहावे. जर 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलन तीव्र करणार. तो पर्यंत धीर धरा असे, आवाहन मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारला आता बिलकुल सुट्टी नाही, आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला पाहिजे. मराठा समाज कायम सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिला. आम्ही कधी जातीवाद केला नाही. 75 वर्षात या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजांने केले. त्यामुळे आता आपल्याला आपली लढाई लढायची आहे. ज्या नेत्यांना आपण मोठे केले आज तेच आपल्या आरक्षणाच्या मुळावर उठले आहेत. तेच आज मराठा आरक्षण मिळू देणार नाही अशी भाषा बोलत आहेत. त्यामुळे जागे व्हा, आपली लढाई आपल्याला लढायची आहे. असे म्हणत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाना साधला. जरांगे यांनी मराठा समाजातील आमदारांना समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सर्वांनी मराठा समाजाला घेरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजातील आमदारांनी आता मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहाण्याची ही खरी वेळ आहे. मराठा समजाती नेत्यांनो मराठा लेकराला आता तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला मोठे करण्यात आमच्या बाप जाद्यांचे योगदान आहे. तुम्ही जर पाठीशी उभे राहिले नाही तर मराठे तुम्हाला माफ करणार नाहीत. असा इशारा देखील आमदारांना दिला आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाकडून तारीख पे तारीख- मनोज जरांगे म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ फक्त तारीख पे तारीख देत आहे. त्यामुळे आता सरकारमधील काही मंत्र्यांना थेट फोन करून याबाबत जाब विचारणार आहे. आता यांना टाईम बॉन्ड देणार नाही तर थेट शेवटचे विचारणार आहे. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्या आहेत. 1805 पासून 1967 पर्यंत आणि सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू असून ओबीसी प्रवर्गत मराठे असल्याचे देखील समोर आले आहे. 70 वर्षांपासून मराठ्यांचे कुणी वाटोळे केले याचे उत्तर आता द्यायला हवे, असे देखील जरांगे म्हणाले.

COMMENTS