इब्टाने आदर्शवत काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून प्रोत्साहित केले : प्रा. राम शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इब्टाने आदर्शवत काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून प्रोत्साहित केले : प्रा. राम शिंदे

कर्जत/प्रतिनिधी : कोरोना काळात वंचित, अपेक्षित, पीडित, गोरगरीब जनतेला आपल्या बचतीतून मदत करण्याचे महत्वपूर्ण काम इब्टाने केले. विविध क्षेत्रात आदर्शव

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड
जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू घडवण्यासाठी सहकार्य करू ः विवेक कोल्हे

कर्जत/प्रतिनिधी : कोरोना काळात वंचित, अपेक्षित, पीडित, गोरगरीब जनतेला आपल्या बचतीतून मदत करण्याचे महत्वपूर्ण काम इब्टाने केले. विविध क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून  प्रोत्साहित करण्याचे काम महत्वाचे आहे. मी मंत्री असताना जो बाका प्रसंग आपल्या संघाच्या पदाधिकाऱ्यांवर आला, त्या प्रसंगाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संघाच्या खंबीरपणे मागे उभा राहण्याचे काम मी केले. त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली, असे मत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
कर्जत येथे आदर्श बहुजन शिक्षक संघ आयोजित आदर्श शिक्षक, गुणवंत अधिकारी व यशस्वी उद्योजक यांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हा सचिव अशोक नेवसे हे होते. अशोक नेवसे यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाचा हेतू सांगितला. यावेळी प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उद्योजक मेघराज बजाज, बाळासाहेब साळुंके, शिवाजीराव फाळके, सुनिल यादव, निता कचरे, गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे, संघाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. भास्कर पाटील, बाळासाहेब साळुंके, विक्रम अडसूळ आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमासाठी पुरस्कारार्थी, त्यांचे नातेवाईक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ अडसूळ यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. सुनिल कुलांगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इब्टाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


पुरस्काराचे मानकरी :
आदर्श अधिकारी – सुरेश वाघचौरे (नायब तहसीलदार), यशस्वी उद्योजक – मेघराज बजाज. आदर्श शिक्षक – कचरू पंडित, शरद ढवळे, सुप्रिया निकत, वनिता जगताप- यादव, संगिता देशमाने, सुवर्णा म्हेत्रे, सुभाष झेंडे, शबाना सय्यद, सुधाकर गाडे, पांडुरंग  अडागळे, अपर्णा साबळे, गोरख महारनवर, सुवर्णा ससाणे, नंदकुमार गोडसे, किसन आटोळे, सत्यवान अनारसे, बाळू  गार्डी

COMMENTS