Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयएएस पूजा खेडकरच्या आईला अटक

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना गुरूवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेतकर्‍यांना धमकावल्या प्रकरणी त

भाजपकडून मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न ः खा. रजनी पाटील
डिजिटल रुपया होणार लॉन्च ?
*तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २८ जून २०२१ l पहा LokNews24*

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना गुरूवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेतकर्‍यांना धमकावल्या प्रकरणी त्यांना महाड येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात आणले जात आहे. मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकर्‍याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसल्या होत्या. या प्रकरणी त्यांचाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांनपासून त्या फरार होत्या.

प्रोबेशन काळात पुण्यात नियुक्तीला आलेल्या आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या आलीशान ऑडी गाडीला परवानगी नसतांना अंबर दिवा लावला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा कक्ष बळकावत त्यांनी तेथे त्यांचे कार्यालय थाटत स्वत:च्या नावाची पाटी देखील लावली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या मुळशी तालुक्यात एका जमीनीच्या वादातून शेतकर्‍यांसोबत हुज्जत बाजी आणि शिवीगाळ करतांना दिसत आहे. मनोरमा खेडकर यांनी हातात बंदूक घेऊन शेतकर्‍यांना धमकावले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी बेहिशेबी संपत्ती कमावली आहे. यातून त्यांनी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. अशीच के जमिन मुळशी तालुक्यातील एका गावात 25 एकर जमीन त्यांनी खरेदी केली कसून त्यांनी शेजारी असलेल्या शेतकर्‍याच्या शेतजमीनिवर अतिक्रमण केले आहे. हा वाद कोर्टात सुरू असतांना संबंधित शेतजमीनीवर जाऊन जमीन कसत असणार्‍या शेतकर्‍यांना मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल आणि बाऊन्सर घेऊन शेतकर्‍यांना धमकावले. दरम्यान, खेडकर कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात देखील शेतजमिन खरेदी केली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघड केली आहे.

COMMENTS